आत्ताच मनात आलं म्हणून सहजच लिहायला घेतोय,
चोरासारखं स्वतःचच मन स्वतः चोरायला घेतोय,
वाटत होत मनातिल सगळ खुल्या पुस्तकासारखं वाचायला देतोय,
पण कोणी ते वाचून आत येणार नाही याची दक्षता घेतोय.
वाटत उंच उंच पावलांनी उंच उड्या माराव्यात,
परंतु पावला खाली कोणी दुखावणार नाही याची दक्षता घेतोय,
काटा मला रुतला तरी चालेल पण मी कोणाचा काटा बनू नये ,
वरच्याचा मी आधार घेतो त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवतो,
जगी या सर्व सुखी कोणी नाही तरीही स्वतः सुखी राहायचा प्रयत्न करतो.
स्वतःच्या मेहनतीवर विश्वास आहे मनगटात मेहनतीची तयारी आहे,
कोणीही पाय ओढू नका मागे माझा पुढे जायचा पक्का इरादा आहे.
वाघा सारखा वाघ असतो जातीला त्याच्या माज असतो,
मी वाघ असलो तरी चालेल पण माज मात्र मला नको.
नको तो पैसा, नको ती दौलत हे सर्व काही व्यर्थ आहे
प्रेमाचे दोन शब्द् न मायेचा डोक्यावर हात यालाच खूप अर्थ आहे.
कसून कस जमीन कस पेरलेल्या बियाण्याचे रोप असेल,
आज केलेल्या पुण्याचे सात जन्मी तरी तुझ्यावर ऋण असेल.
मनात मन माझे मन सांगायला तर खूप आहे,
पण मनातले संपूर्ण मन बाहेर यायला अजूनही खूप वेळ आहे.
आत्ताच मनात आलं म्हणून सहजच लिहायला घेतोय,
चोरासारखं स्वतःचच मन स्वतः चोरायला घेतोय,
वाटत होत मनातिल सगळ खुल्या पुस्तकासारखं वाचायला देतोय,
पण कोणी ते वाचून आत येणार नाही याची दक्षता घेतोय.
रितेश रविंद्र वेदपाठक.