श्री स्वामी समर्थ
इ.स.१८७० पासुन श्री स्वामीसुत महाराज प्रस्थापित श्री स्वामी महापर्वणी, म्हणजेच श्रींच्या पादुकांचा पारंपारिक समुद्रस्नान(अभिषेक) सोहळा हा या वर्षी फाल्गुन शु. द्वितीया- मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी आहे हे ऐकुन खुप आनंद झाला.
रविवार दिनांक ८ जानेवारी २०१७ रोजी याच उत्सवाची नांदी म्हणुन स्वामींवर शर्कराभिषेक झाला, खुप प्रसन्न वाटले.मी सपत्नीक या सोहळ्याला उपस्थित होतो.
गेल्या वर्षीपर्यंत मला या उत्सवाची पुसटशी देखील कल्पना नव्हती, या उत्सवाला गेल्या ११ वर्षांपासुन वसई(प) येथील श्री. पांडुरंग हरि भजन मंडळ हे गेली ११ वर्षे सातत्याने भजन सेवा करतात हे मला कानावर आले. २०१६ च्या उत्सवाला येणार का? अशी विचारणा मला एका मित्राने केली, संमति दर्शवताच त्यालाही आनंद झाला. स्वामींच्या उदंड प्रेमाचा अनुभव त्यावेळी मला झाला, हा अनुभव शेअर करण्याची आज महाराजांकडुन अनुमती मिळाली.
फाल्गुन शु. द्वितीया- गुरुवार, दिनांक १० मार्च २०१६ रोजी, काळाराम मंदिरातील ठाकुरदास बुवा स्थापित श्री स्वामी समर्थ मठातुन महाराजांची स्वारी गिरगांव चौपाटीकडे निघाली, पालखी मंदिरातुन बाहेर निघतच होती, भजनी मंडळी भजनामध्ये गर्क होती त्यातच मी देखील होतो अचानक एक आवाज आला, मिलिंदच्या अंगावर उपरणे घाल. तेव्हा लक्षात आले, माझ्या जवळील बॅगेत पिठापुरम येथील संस्थानाचे प्रसाद रुपात मिळालेले उपरणे आहे. मी ते घेतले व थेट मिलिंद पिळगांवकर यांचे जवळ गेलो, ते पायघड्या घालण्यात व्यस्त होते. तिथेच त्यांना हाक मारली आणि महाराजांनी हे द्यायला सांगितलंय असे म्हणालो त्यांनी त्या प्रसादाचा स्वीकार केला, पुढे पालखी पुन्हा मंदिरात येई पर्यंत ते उपरणे मिलिंद दादा यांच्या खांद्यावरच होते.
समुद्र स्नानाच्या वेळी आत समुद्रात ठराविक मंडळीच जाणार होती, मी व माझे एक मित्र यांना देखील आत जायला मिळाले होते मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आपल्याला आत जायला मिळतंय म्हणुन पण, नो बॉलवर षटकार ठोकावा अशी संधी मिळाली आणि आनंदाला सीमाच उरली नाही, चंद्रकांत मेस्त्री दादा यांनी समुद्र स्नान ज्या मुर्तीवर होत होते ती मुर्ती माझ्या हातात ठेवली, पादुकाही हातात मिळाल्या स्वामींच्या लीला पहिल्या आणि पुढे मी नि:शब्द..........
एक वर्ष लोटत आले २०१७ च्या समुद्रस्नान सोहळ्याची तयारी सुरु झाली, शर्कराभिषेक झाला, आज दिनांक २१जानेवारी २०१७, एक स्वप्न पाहुन खडखडीत जागा झालो आजुबाजुला मेस्त्री दादांना शोधत होतो, पण समोर ते नव्हते तेव्हा भानावर आलो की मी स्वप्न बघत होतो घड्याळ पहिले तर (ब्रम्हमुहूर्त) पहाटेचे ३ वाजले होते , अचानक एक आवाज आला "चंद्रकांत आणि मिलिंदला म्हणावं निमंत्रण मिळाले" तेव्हा स्वप्न आठवले ते असे होते
मी माझ्या वसई(प) येथील कार्यालयात आलो असता तेथे श्री.चंद्रकांत मेस्त्री हे उपस्थित होते, महाराजांना निमंत्रण देण्यास आलो असे ते म्हणाले (माझ्या कार्यालयात स्वामींचा दरबार मांडलेला आहे), फाल्गुन शु. द्वितीया- मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी होणाऱ्या सोहळ्याचं ते निमंत्रण होते. झोप उडाली आणि समजलं की ते स्वप्न नव्हतं तर मिलिंद पिळगांवकर आणि चंद्रकांत मेस्त्री यांनी दिलेल्या आमंत्रणाचं महाराजांनी दिलेलं प्रतिउत्तर होत. महाराजांच्या असंख्य लीला ना तेव्हा कोणाला समजल्या ना आत्ता पुन्हा मी नि:शब्द.......
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जे लिहिले ती प्रेरणा, ते एकुण एक शब्द महाराजांचे, आम्ही नेहमीच नाममात्र...
आपला,
स्वामीभक्त(खुळा) वसई (प)
रितेश रविंद्र वेदपाठक.
०८४२११३२२२४/ ०९७५७०६९६९२