एक पेन चुक करू शकतो पण,एक पेन्सील कधीच चुक करत नाही कारण,तीचा पार्टनर (खोडरबर)तीच्या सोबत असतो. तो तिच्या सर्व चुका सुधारतो...
आपल्या सामान्य मानवाच्या जीवनाचे देखील असेच पेनासारखे झाले आहे, आपण चुकांवर चुका करत जातो पण, त्या समजवायला आपल्याला कान धरणारे कोणीच नाही. दिवसेंदिवस आपण we are well educated म्हणत we are much matured करत बसतो, त्यात आपल्याला कोणीही समजावत नाही, किंबहुना आपण कोणालाही समजूनच घेत नाही.
म्हणुनच जीवनात आपल्याला एक तरी खोडरब्बर हवा पण गुरु रुपात, जो आपल्या चुका सुधारेल, योग्य वाट दाखवेल, परंतु हल्ली बरेच जणं गुरूच्या शोधात असतात, मला गुरू हवा, मला गुरू हवा करत बोंबलत असतात. त्याचा परिणाम म्हणुन ऐरे- गैरे येतात आणि त्यांचा फायदा उचलतात, ज्यांना स्वतःचा रस्ता माहीतच नाही ते इतरांना काय रस्ता दाखवणार?
तुम्हाला जर योग्य गुरू हवा असेल तर एकच सोप्पा मार्ग आहे, तो म्हणजे "नामस्मरण." स्वतःला नामस्मरणात इतके घोळून घ्या ना की स्वतः साक्षात परब्रम्ह समोर आला पाहिजे तुमच्यासाठी. तुम्ही का शोधता गुरू? आपली लायकी इतकी बनवायची ना की गुरुच आपल्याकडे आले पाहिजे. बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकले आहे की , सध्याच्या जगात सदेह रुपात गुरू असावा, मग हा जो सदेहरूपी गुरू आहे तो योग्य की अयोग्य हे कोण सांगणार? आपल्याला अजून धड बोलताही येत नाही काही ज्ञानच नाही तर योग्य अयोग्य आपण काय सांगणार? म्हणजे जर समोरचा तोतया निघाला तर? गेला वेळ वाया? त्यापेक्षा सोडा त्या सदेहरूपी गुरूला. नामस्मरणात वेळ दवडा तुमचा खोडरब्बर स्वतः येईल समोरून, त्या पेन्सिलीला सुद्धा कागदावर उमटण्या अगोदर स्वतःला झिजवावेच लागते, तेव्हा कुठे योग्य- अयोग्याची जाण येते आणि खोडरब्बर त्याचा गुणधर्म दाखवतो.....
या सर्वाचा अट्टाहास इतकाच की भले-भले आले आणि गेले पण नामस्मरण हेच सर्वांचे साधन होते, नामस्मरणाला कसलेही बंधन नाही, कुठेही करा, कितीही करा, कसेही करा काहीही हरकत नाही, आणि Result Gaurented......
बघा किती हजम होतेय ते, सांगायचे कर्तव्य केले बाकी महाराजांची ईच्छा...
श्री स्वामी समर्थ....
श्री. रितेश रविंद्र वेदपाठक
स्वामीभक्त(खुळा)
8421132224