खुप सोपे असते एखाद्याला महान करणे, एखाद्याच्या पायावर डोके ठेवण्याची ईच्छा व्यक्त करणे, त्या मागची साधना आपण किती लक्षात घेतो? साधना करणे इतकेही सोपे नसते ना? त्या साधकाला कित्येक परीक्षांना सामोरे जावे लागते, घर- दार सोडावे लागते, संसारिक गरजा भागवताना त्याची झालेली तारेवरची कसरत कोणीच पाहू शकत नाही, त्यांच्या आई- वडीलांची झालेली तळमळ कधी पहिली आहे का? , त्याच्या बायकोने त्याचा चालवलेला संसार कधी समोरून पहिला आहे का? नाही शक्यच नाही. एखाद्याला महान ठरवणे सोपे असते पण त्याच्या सारखे स्वतःला घडवणे मुश्किल. तोंड दाबून प्रचंड बुक्क्यांचा मार सहन करायची कोणाचीच हिम्मत नसते, घरचे दाखवायला सोबत असतात पण किती समजून घेतात? अजिबात नाही. पण ही सर्व त्याला घडवण्यासाठी झालेली परीक्षा असते, दुनियेच्या नजरेत तो महान असतो पण त्यामुळे त्याच्या घरच्यांना झालेला त्रास कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? नाही कोणी समजून घेणारच नाही. त्यांनाही वाटत असणार आपला माणूस हरवतोय म्हणून, पण महाराजांनी काही निराळेच ठरवलेलं असते हे त्यांना नाही समजत, प्रेमाने त्यांना आंधळं केलेलं असतं. बाहेरून मिळणारी ईज्जत कधीकधी त्याच्या साधनेमुळे आपल्या माणसांना दिलेल्या त्रासामुळे त्याला सहन होत नाही, पण हे त्याच्या घरच्या माणसांना कळत नाही ना. त्याच्यात होणारे बदलावं म्हणजे कोणाच्या तरी तालावर हा नाचतो आहे हे देखील त्याला ऐकावे लागते, बाहेरचे लोक बोलतात तेव्हा ऐकता ना मग माझेही ऐका म्हणणारी त्याची पत्नी जेव्हा त्याचे क्लास घेते तेव्हा तो काय उत्तर देणार?
असो या सगळ्याचा होणार त्रास सहन करत साधने कडे जोर देत पुढे जावेच लागते , त्यावेळी कोणत्याही भावानेसाठी जागा नसते, एका वेगळ्या विश्वात त्याची जागा बनलेली असते गरज असते ती त्याचे ते विश्व समजण्याची, त्या भावना समजण्याची त्याच्या घरच्यांनी त्याला समजण्याची, बाहेरील विश्व विसरून अध्यात्मिक विश्वात मदत करण्यासाठी. त्या साधकाची साधना त्याची एकट्याची नसते त्याच्या सर्व परिवाराची असते, आई- बाबा, बायको, भाऊ-बहीण, मुलांची, मित्रांची व त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचीच असते, कारण या सर्वांनाच कुठेतरी सहन करावे लागते, सर्वांनाच परीक्षा द्यावी लागते, त्याला केलेला नमस्कार हा त्याच्या त्या सर्व सोबत्यांना देखील असतो, त्यांच्याही सेवेला असतो, त्या सर्वांच्या सेवेला मानाचा मुजरा......
एक वेळ असते जिथे शांत राहण्याचीच गरज असते, पण सहज साधनेत लोकांना समजतच नाही वैव्यक्तिक भावनेत वाहून जातात, खरे- खोटे समजत नाही त्यामुळे नको त्या विषयांकडे वळत नामस्मरणाचा प्रभाव कमी पडतो, इतर विषय डोक्यात फिरायला लागतात, हे असे का? तसे का? या विषयात गुंतवतात. सर्व सोडून नामस्मरणाचा आस्वाद घ्यायचा. समोरचा साधक खरंच साधक आहे की नाही हे ओळखण्यासाठी स्वतः साधक बना, स्वतः मेहनत करा, आणि साधकाचे गुण समजून घ्या.....
स्वामी,दत्त आणि गुरुतत्व एकच आहे
नामाचा आनंद घ्या , स्वामींच्या सानिध्यात खूप अनुभव येतात आजच्या कलियुगात तेच सर्व प्रकारे आपल्याला सांभाळतात, पण कलीचा महिमा आहे त्यामुळे साधना प्रत्येकाला जमत नाही, म्हणून ज्योतिष शास्त्राचा वापर अनिवार्य आहे, साधनेच्या जोरावर सर्वांवर मात करता येते, तोपर्यंत एका आधाराची गरज लागतेच. योग्य साधना सुरू होऊन योग्य मार्गी लागली की स्वामी संपूर्ण रुपात सांभाळतात. पदवीधर होण्यापूर्वी अनेक परीक्षा द्याव्या लागतात त्यावेळेस गाईड हे वापरावेच लागते अगदी तसेच स्वामी योग्य साधना घडवताना आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ईतर मार्ग वापरावेच लागतात.
श्री स्वामी समर्थ
स्वामीभक्त,
श्री रितेश रविंद्र वेदपाठक.