Friday, December 29, 2017

खडतर आयुष्य

कधी कधी आयुष्य खूप खडतर वाटेवर जगले जाते, मी मी म्हणणारे बऱ्याच वेळा शेपूट घालून बसलेलं पाहिले आहे. सर्वांना वाटते की माझेच अस कस झालं? मीच का या सगळ्यात, अजून किती सहन करू, माझे भोगच असतील हे कशावरून? असे एक ना अनेक प्रश्न असतात डोक्यात.

माझ्या जागेवर बसून बघा एक एक असे विषय असतात,की ते पाहिलं की आपले बर चालले आहे असे वाटतं, कोण कुठची एक आई तिच्या लेकी सहित नातीला घेऊन आली. लेकीचं पाहिले लग्न मोडले, दुसरे केले तर वर्षभराच्या आतच नवरा पोटात पोर असताना देहच सोडून गेला, नंतर सासू सासऱ्यांनी पैसा लुटला आणि हिला घराबाहेर केले, आता तिची लेक 5 वर्षाची झाली ही कहाणी सांगताना आजी ढसाढसा रडत होत्या.
लेकीची मानसिक स्थिती ढासळली सर्व बाजुंनी हरली, लढावेसे वाटते म्हणाली पण परिस्थिती अशी आहे की लोक जगू देत नाही. प्रत्येक जण फक्त वापर करतो आणि त्यांची वेळ निघाली की फेकून देतो.

कहाणी घर घर की आहे, पण आजींना स्वामींवर विश्वास आहे, कर्म आड येते हे मान्य आहे पण महाराज आहेत न्याय करायला असे त्या आजी म्हणतात, खरे आहे ते पटते मनाला. पण कर्माचा सिद्धांत कोणालाही सोडत नाही, योग्य वेळी तुमच्या नशीबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळनार, पण तो पर्यंत तठस्थ भूमिका घ्यावी लागते, मानसीक त्रास सहन करीत योग्य मार्गाने चालत राहिलो तर महाराज हाक नक्कीच ऐकणार, किती दिवस अजून सहन करू? याचे उत्तर माझ्याकडे देखील नव्हते, कारण योग्य वेळ आली की ती उत्तरं त्यांना मिळणार, तोपर्यंत शांतपणे 5 वर्षाच्या लेकीसाठी जग हाच सल्ला मी दिला......


मन हेलवणारे क्षण असतात कधीकधी,
सुचत नाही काही, बुद्धी मठ्ठ होते,
मी, माझे, माझंच करणाऱ्यांना सांगावेसे वाटतं, कधीतरी अश्या लोकांचा विचार करा. नुसत्या विचारांनीच तुम्ही उदास व्हाल, तर प्रत्यक्ष ती परिस्थिती जगणाऱ्या त्या देहाचे आणि मनाचे काय हाल होत असतील? विचार देखील करवत नाही.

सांगण्याचे उद्दीष्ट इतकेच की, आपली परिस्थिती या माऊलीच्या परिस्थिती सोबत जुळवा, आपली वेळ कित्येक पटीने चांगली आहे म्हणुन जगण्यासाठी स्वामीकृपेने बळ मिळेल..........

योग्य वेळ लवकर येवो, आणि अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व स्वामीभक्त स्वतःच्या असलेल्या विपत्तीतून बाहेर येवो हीच या खुळ्या स्वामीभक्ताची महाराजांच्या आणि गिरनारीच्या चरणी प्रार्थना...
श्री स्वामी समर्थ
स्वामीभक्त(खुळा)

Wednesday, December 20, 2017

नाद खुळा रे नाद खुळा गीरनारी नामाचा नाद खुळा.....

दत्त नाम हे मुखी घेऊनि स्वामी गातो तव चरणी,
हे दिन दयाळा संरक्षण द्या तव उदरी,
कलीचा हा महिमा भयंकर पण शेवट आहे सत्याचा,
आस आहे मनी तव भेटीची करुणा भाकतो गुरुरायाची....

स्वस्त बसावे ध्यान लागावे मस्तीत तुझ्या मी रंगून जावे,
मुखी घ्यावे नाम दत्ताचेच ध्यान मन माझे हरवून जावे,
लाडाचा मी रे खुळा तुझा तू ना शब्द माझा वाया करी,
धाव घेई मी दहा हजार पायऱ्यांवरी मिठीत घेई मज गिरनारी....

नाव तुझे रे गिरनारी सर्व श्रेष्ठ तू गुरुवर्य अवधुत अवतारी,
नाद खुळा तुझा जनजीवा लागे पितांबर तुझं अंगी बहू साजे,
कमंडलू तव हाती आहे तहानलेली जनता तूच गंगेद्वारे सुखावे,
पायी खडावा गर्जती नाद त्याचा आमुचे कानी गुंजती....

महादेव तू ब्रम्हानंदी ब्रम्ह कमळी तू दर्या सागरी विष्णु रूप तू,
मद मस्त तू साधनेचा राजा सर्वलोकी तुझाच गाजावाजा,
सर्वसिद्ध तव पदी नाचे तुझ्या मनी मात्र मी अति विराजे,
नाद खुळा रे नाद खुळा गीरनारी नामाचा नाद खुळा.....

श्री स्वामी समर्थ,
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी...

आपला,
स्वामीभक्त(खुळा)
श्री. रितेश रविंद्र वेदपाठक.

Tuesday, December 19, 2017

जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी...

जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी

दहा हजार पायऱ्या चढतांना बऱ्याच जणांना सर्वात पहिले डोळ्यासमोर अंधारच येतो, इतक्या पायऱ्या आपण कसे चढणार? यातच अर्धे खचून जातात, त्यापेक्षा नामस्मरण करत चढतांना खूप मजा येते.
दत्त पादुकांचे दर्शन मन मोहून जाते, दत्त धुनीचा मंद सुवास शरीरातला सर्व थकवा घालवून टाकतो, आजूबाजूचा डोंगररांगांचा परिसर तिथेच बैठक मारायला भाग पाडतो. परंतु अशा अवस्थेत तिथे बसणेही मुश्किल, लोक आपल्याच पाया पडायला रांगा लावतात, आणि मग तेथून पळ काढावा लागतो.......

दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेलं असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मलातरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा गिरनार ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला, आणि आजही पुरवत आहेत, बरीच मंडळी मागे लागतात की आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत घ्या, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही? अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्व कष्टाच्या साधनेने, उगाच ओढून- ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्वाची, नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही, भले- भले संत- महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते, मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जाते. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही, दहा वेळा बजावून देखील ऐकले नाही की सळो को पळो करणार आणि अक्कल आली की सरळ रेषेत आणणार. तो पर्यंत वेळ जातो आणि कष्ट खूप करावे लागतात, पण पर्याय नसतो. म्हणूनच वेळेवर योग्य वागणे गरजेचे आहे.सरळ साधे नाम घ्यावे, त्याच रंगी रंगावे आणि समाधान मानावे, परमार्थ त्यातच मिळतो, उगाच मला हवेच म्हणून काहीच मिळणार नाही उलट हातातले गमवायची येते. त्यापेक्षा मिळेल ते घेऊन जपले तर कृपा वर्षाव अनंत कृपेने रहातो.

पिछे ना आ मेरे यारा, हमारे हाथ कूछ भी नही,
हमतो वो फकीर है जीसकी झोली भी खाली है,
हमतो कुछ भी नही स्वामी ही खिलाडी है ll
बाबाके खेल बाबाही जाने हमतो उसके बिघडे शेहजादे.....

आपला,
स्वामी नामी बिघडलेला
स्वामीभक्त(खुळा)
रितेश रविंद्र वेदपाठक.
🚬जय शंकर