नमस्कार,
ध्यान या विषयावर किती आणी काय बोलू हे काही मला समजत नाही पण जे माझ्या मनाला पटतय तेच लिहितोय.
ध्यान ही एक अदभूत अशी साधना आहे जीच्यासाठी शरीरावरील संपूर्ण संयम सोडावा लागतो. कारण ध्यानामुळेच आपल्याला आपल्या भगवंताचे दर्शन घडते आपल्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि आपण मोक्षाचे धनि होतो. कोणी कितीही साधना केली तरीही त्याला ती अपुरीच वाटते कारण साधनेला सीमा नसते. साधना करण्यासाठी ध्यानाची नितांत आवश्यकता असते मन,शरीर यांचा एक अमुलाग्र संगम आवश्यक असतो कारण त्यामुळीच परमार्थ साधता येतो कोणत्याही अरिष्टावर मात करता येऊ शकते.
ध्यान करताना जागा कोणतीही असू दे काही फरक पडत नाही फक्त मन खंबीर असायला हवे, आपण ज्या जागी असू तेथेच आपण ध्यान लाऊन साधना करू शकतो. डोळे हळूहळू बंद करावेत कोणताही ताण आपल्या मनावर देऊ नये आणी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहुन हळूहळू बाहेर येत आहोत अशी धारणा करावि. त्या ठिकाणाहून आपण पुढे जात आहोत आजू -बाजूला खुप गडबड -गोंधळ आहे त्यातून पण थोडेसे पुढे गेल्यावर वातावर शान्त आहे , फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे तिथुन अजून पुढे शांत वातावरण, वरती शांत आकाश, खाली शांत धरणी माता आहे. त्यातूनच आपल्या मनाला शांत करायचे आहे, अजून थोडे पुढे जायचे आहे आपण जरी प्रत्यक्षात जात नसलो तरी मनाने जायचे आहे, त्यातच खरी मजा आहे. अजून पुढे संपूर्ण शांतता आहे इथे आपल्याला कसलाच आवाज नाही, ना पक्ष्यांचा ना आणखीन कसलाच. आता आहोत ते फक्त आपण स्वतः, वरती मोकळे आकाश खाली हिरवीगार धरती माय. तसेच पुढे आलो की आपल्यासाठी अंथरलेले आसन, त्यावर बसून समोर पाहिले तर समोर साक्षात गणपती बाप्पा आहेत, डाव्या हाताला आपले गुरू, उजव्या हाताला देवगुरु बृहस्पती, त्यांच्या मागे भगवान शिव - पार्वती, विष्णू- लक्ष्मी, ब्रम्हा - सरस्वती, इंद्र आणि सोबत समस्त देव परिवार, गंधर्व परिवार, समस्त गण परिवार पण इतके सगळे असून देखील कोणाचाही आवाज नाही.
आपण आपली मानसपूजा सुरू करायची, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची, " हे गुरुवर्य मी तुम्हाला शरण आहे माझी अल्पमती काहीही समजून घेण्यास असमर्थ आहे, त्यामुळे आपणच माझ्याकडून योग्य ती सेवा घडवावी ही विनंती. हे गुरुवर्य आपण मला योग्य रस्ता दाखवा, तुम्ही दाखवलेल्या मार्गानेच मी चालेन, आजपासून मी माझे सर्वस्व तुम्हाला देत आहे, तुमच्या चरणी सर्वसमर्पण करीत आहे, माझे योग्य- अयोग्य तुम्ही पाहावे येणाऱ्या भोगांना भोगण्यासाठी आपण मला शक्ती द्यावी ही विनंती.
असे बोलून आपण आपले डोळे बंद करायचे व आपल्या ध्यानात जाण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या श्वासावरील आपले नियंत्रण हळूहळू सोडायचे शरीराला हळूहळू वजन मुक्त करायचे, हळूहळू आपण एका वेगळ्याच विषयात- विश्वात रममाण होतो नामाची गोडी फार सुंदर आहे त्यात एक वेगळीच नशा आहे. आपला भार आपल्या गुरूंवर सोडून आपण नामाच्या दुनियेत रममाण व्हायचे. त्यानंतर जे घडेल ते घडू द्यावं. या दरम्यान शरीरावर कोणतेही बंधन ठेवायचे नाही. आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्ती हळूहळू जागृत होऊन तिचे कार्य सुरू करते आणि साधक साधनेच्या विशिष्ट पातळीवर पोहोचतो.
या साधनेनंतर येणारे अनुभव हे विलक्षण असतात, आपण कोठे आहोत याला महत्त्व न देता आपण काय मिळवले याला महत्त्व द्यावं, ध्यानाची ही अजब मजा प्रत्येकाने चाखावी हे माझे वैयक्तिक मत आहे.
स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश र वेदपाठक.