Thursday, December 10, 2015

श्री स्वामी समर्थ
गुरु शिवाय आध्यात्मिक अभ्यासाने बौद्धिक ज्ञान वाढेल, अ त्याच बरोबर अहंकार पण वाढेल परंतु पाप नाश व आत्मिक शांती मिळणार नाही.म्हणून अध्यात्मिक जीवनात सदेहरूपी गुरु असणे फार महत्वाचे आहे, गुरु असल्या शिवाय अध्यात्मिक तंत्रज्ञानाचा अधिकारच प्राप्त होत नाही.
गुरु व् मंत्र यात फरक नसतो व ज्यांना ध्यानात सहस्त्राधार चक्रात श्री गुरूंचे ध्यान करणे जमत नसेल तर प्रत्यक्ष सहवासात राहून  दृष्टिसुख अनुभवावे कारण गुरु हाच एकमेव कल्याण कारक आहे.
गुरुवर श्रद्धा अध्यात्माची श्रद्धा निर्माण करते या पृथ्वीतलावर गुरुच एक तारक-रक्षक-पालक असतो. गुरु संतुष्ट झाल्याने सर्व देवता संतुष्ट होतात. गुरुकृपेपेक्षा श्रेष्ठ ऎसे शास्त्र-मन्त्र-तप-फळ-देवता नाही.
गुरुकृपाच श्रेष्ठ व मोक्षदायक आहे नित्य गुरुसेवा-गुरुभक्ति करण्याचे योग हे दुर्लभ असून त्या मुळे भक्ताची मंत्र सिद्धी होउन तो जीवन मुक्त होतो.
भारताच्या आध्यात्मिक विश्वात सद्द्या जे काही आध्यात्मिक मार्ग अस्तित्वात आहेत त्यात काही सिद्धिंच्या प्राप्तीने अनेक जण तथाकथिक गुरु बनून भोळ्या-श्रद्धाळु जनांचा फायदा घेत आहेत व चुकीच्या मार्गाने नेत आहेत ईश्वरी कार्यात अडथळे निर्माण करणाऱ्या अशा लोकांचा वंश नाश होउन पृथ्वीवरील त्यांच्या पिढीचे अस्तित्वच नष्ट होते.
चांगल्या बरोबर वाईट हे प्रकृतीचीच लीला आहे आणि स्वामींचे खेळ सुद्धा स्वामीच जाणतात मी पामर काय बोलणार
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

Thursday, July 30, 2015

स्वामींचा एक अद्भुत अनुभव
आज दिनांक 30 जुलै 2015 रोजी मी स्वामींच्या पादुका (ज्याची मला गुरुपौर्णिमा दिनी स्थापना करायची होती) घेऊन दादरच्या मठाजवळ पोहोचलो. मनात एक वेगळीच ओढ़ होती (स्वामींच्या मूर्तिचि स्थापनासुदधा करायची आहे) आणि समोरच एका मोहक मूर्तिवर नजर खिळली.
ती मूर्ति आणि पादुका घेऊन मि दादरच्या मठात आलो आणि समोर सेवेत असलेल्या गुरुजींनी मूर्ति आणि पादुका त्यांच्या हातात घेतल्या
आणि संस्कार केले तो क्षण मि कधीही विसरु शकणार नाही बरोब्बर 12 वाजले होते आणि संस्कार होत असताना मला खुप गहिवरुन आले साक्षात स्वामींच्या उपस्थितिचि जाणीव होत होती.
    पाहिले पादुका हातात मिळाल्या वजन पेलवत नव्हते. गुरुजींनी प्रश्न केला तुमच्या बरोबर कोणी आले आहे का?? मि नाही म्हणालो. पुढचा प्रश्न आला मग पादुका आणि स्वामी नेणार कशे?? मि म्हणालो माझ्या बरोबर स्वामी आहेत ते नेतिल मला. ते हसले व स्वामींची मूर्ति दुसऱ्या हातात ठेवली आणि म्हणांले उद्याचा मुहूर्त आहे तुमचा स्थापना उद्याच करा खुप गहिवरुन आले डोळ्यात आपणच अश्रु उभे राहिले ते काही थांबण्याचे नाव घेत नव्हते साक्षात स्वामींना आपल्या अंगावर घेऊन फिरणे काय असते ते आज समजले. सम्पूर्ण अंग जड़ झाले होते, पायाची चाल मंदावली होती. कसाबसा स्टेशनला पोचलो रेल्वेत बसलो तरीही तेच! माझ्या मांडीवर बसलेले स्वामी त्यांच्या  अस्तित्वाचि जाणीव पदोपदि करून देत होते. कसेबसे वसईला पोचलो.बाहेर येऊन रिक्षा पकडून घरि पोचलो आणि आमच्या सौ. नी स्वामींची दृष्ट तांदूळ पाण्याने काढली आणि घरात पाऊल येताच मि पहिले देवघरात आलो पाटावर आसन ठेऊन स्वामीना त्यावर ठेवले आणि हुश्य केले.
एक अनोखा अनुभव असाही घेतला. उद्या त्याच पादुका आणि स्वामींच्या मूर्तिचि स्थापना माझ्या कार्यालयात करीत आहे आपण उपस्थिति दर्शवावि ही विनंती🙏🙏🙏
रितेश रविंद्र वेदपाठक
(स्वामीभक्त)

Saturday, May 23, 2015

दत्त नामाची ओढ

                                      ll श्री स्वामी समर्थ ll 

           दत्त नामाची ओढ ही कोणत्याही व्यसना सारखीच आहे. फरक फक्त इतकाच कि या व्यसनाने आपली कोणतीही  हानी होत नाही उलट फायदाच होतो. मनात एक ठाम विश्वास असतो माझे सद्गुरु कायम माझ्या पाठीशी आहेत. नाही जन्म नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रकटला अद्भूतसा ब्रम्हांडाचा हाच पिता हे असे जे म्हटले आहे ते काही खोटे नाहि. कारण आपण जन्माला आल्यापासून जी नाती आपल्या भोवती असतात ती फक्त स्वार्थापोटीच मग ते कोणीही असो. माय, बाप, बंधू, भगिनी, हे सर्व एका विशिष्ट मायेने बांधलेले असतात प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो. माय म्हणते माझ्या धन्याने वेळ नाही दिला हे लेकरू आल आता याच्या साठीच जगायच. बाप म्हणतो अजून काही वर्षाने मी मोकळा. बंधू, भगिनी मोठे असले  तर त्यांची कामे आपल्यावर ढकलणार कारण आपण लहान म्हणून आज्ञा मानायची आणि लहान असल्यास त्यांची जवाबदारी उचलायला लावणार कारण आपण मोठे म्हणून. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ आहेच. मुल मोठी झाली कि आई बापाला विसरतात आणि स्वतःच्या प्रपंचाला लागतात. मग आई बाप मात्र रडत, देवाच्या नावे बोटे मोडत बसतात.  मुळातच कोणीही कोणाचीही अपेक्षा ठेऊ नये. 

            या सगळ्याच्या उलट आहे सद्गुरु मार्ग. तोच आला बाप तीच आपली माय. नामस्मरण करत त्याच्या सेवेत रुजू व्हायचं आणि आपल काम करत रहायच दोन वेळेच जेवण मिळत ते आपल्या श्रमा मुळे आपण केलेल्या कष्टा मुळे, त्या कष्टाला फळ देणारा तोच आपला भगवंत, तोच आपला सखा, तोच आपला सोयरा. त्याच्या शिवाय आपले कोणी नाही. म्हतार पणात आपण त्याच्याच सेवेत वाहून घ्यायचे आपल्या मोक्ष्याचा धनी पण तोच. कशाला कोणाची अपेक्षा करायची आणि अपेक्षा भंग झाल्यावर आयुष्यभर रडत बसायचं. मोक्ष हवा तेव्हा तोच भगवंत आपल्याला त्याच्या चरणांजवळ विलीन करून घेईल या पेक्षा तुमच सौभाग्य ते काय?

            भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी समर्थ म्हणतात ते काही उगीच नाही. तुमची श्रद्धा तेव्हढीच अटळ असावी मनात कोणतीही शंका नसावी तुमच्या भक्तीची तोड नसावी. मग बघा  स्वामी कसे तुम्हाला जपतात ते. फुला सारखे जपून झाडा सारखे वाढवून दिव्यत्वाची अनुभव जर चाखायला मिळणार असतील तर त्यात वाईट ते काय? मर मर मरून कमवायचं, आणि मन मारून जगायचं ते कश्यासाठी आणि कोणासाठी? आपण कमावलेलं आपण परमात्म्यात विलीन झाल्यावर आपल्या कामी येत नाही. आपल्या पश्च्यात  त्या  कमाइचा वापर काय होतो हे आपल्याला माहित नाही. मग इतका पैसा कमवून काय कामाचा?
तो आपण असते वेळीच सत्करमी लावला तर निदान आपला मोक्ष तरी सुखकर हॊइल. गुरूंची थोडी सेवा तरी होइल. मनाला समाधान तरी मिळेल म्हणूनच सांगतो 
मुखी नाम स्वामींचे, मनी ठेवा भाव l  
कुणालाही नको लळा, फक्त मज सद्गुरु ठाव. ll


मी काही कुणी लेखक नाही जे मनात आल ते लिहिले


रितेश रवींद्र वेदपाठक. 
( स्वामी भक्त )