ll श्री स्वामी समर्थ ll
दत्त नामाची ओढ ही कोणत्याही व्यसना सारखीच आहे. फरक फक्त इतकाच कि या व्यसनाने आपली कोणतीही हानी होत नाही उलट फायदाच होतो. मनात एक ठाम विश्वास असतो माझे सद्गुरु कायम माझ्या पाठीशी आहेत. नाही जन्म नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रकटला अद्भूतसा ब्रम्हांडाचा हाच पिता हे असे जे म्हटले आहे ते काही खोटे नाहि. कारण आपण जन्माला आल्यापासून जी नाती आपल्या भोवती असतात ती फक्त स्वार्थापोटीच मग ते कोणीही असो. माय, बाप, बंधू, भगिनी, हे सर्व एका विशिष्ट मायेने बांधलेले असतात प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो. माय म्हणते माझ्या धन्याने वेळ नाही दिला हे लेकरू आल आता याच्या साठीच जगायच. बाप म्हणतो अजून काही वर्षाने मी मोकळा. बंधू, भगिनी मोठे असले तर त्यांची कामे आपल्यावर ढकलणार कारण आपण लहान म्हणून आज्ञा मानायची आणि लहान असल्यास त्यांची जवाबदारी उचलायला लावणार कारण आपण मोठे म्हणून. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ आहेच. मुल मोठी झाली कि आई बापाला विसरतात आणि स्वतःच्या प्रपंचाला लागतात. मग आई बाप मात्र रडत, देवाच्या नावे बोटे मोडत बसतात. मुळातच कोणीही कोणाचीही अपेक्षा ठेऊ नये.
या सगळ्याच्या उलट आहे सद्गुरु मार्ग. तोच आला बाप तीच आपली माय. नामस्मरण करत त्याच्या सेवेत रुजू व्हायचं आणि आपल काम करत रहायच दोन वेळेच जेवण मिळत ते आपल्या श्रमा मुळे आपण केलेल्या कष्टा मुळे, त्या कष्टाला फळ देणारा तोच आपला भगवंत, तोच आपला सखा, तोच आपला सोयरा. त्याच्या शिवाय आपले कोणी नाही. म्हतार पणात आपण त्याच्याच सेवेत वाहून घ्यायचे आपल्या मोक्ष्याचा धनी पण तोच. कशाला कोणाची अपेक्षा करायची आणि अपेक्षा भंग झाल्यावर आयुष्यभर रडत बसायचं. मोक्ष हवा तेव्हा तोच भगवंत आपल्याला त्याच्या चरणांजवळ विलीन करून घेईल या पेक्षा तुमच सौभाग्य ते काय?
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी समर्थ म्हणतात ते काही उगीच नाही. तुमची श्रद्धा तेव्हढीच अटळ असावी मनात कोणतीही शंका नसावी तुमच्या भक्तीची तोड नसावी. मग बघा स्वामी कसे तुम्हाला जपतात ते. फुला सारखे जपून झाडा सारखे वाढवून दिव्यत्वाची अनुभव जर चाखायला मिळणार असतील तर त्यात वाईट ते काय? मर मर मरून कमवायचं, आणि मन मारून जगायचं ते कश्यासाठी आणि कोणासाठी? आपण कमावलेलं आपण परमात्म्यात विलीन झाल्यावर आपल्या कामी येत नाही. आपल्या पश्च्यात त्या कमाइचा वापर काय होतो हे आपल्याला माहित नाही. मग इतका पैसा कमवून काय कामाचा?
तो आपण असते वेळीच सत्करमी लावला तर निदान आपला मोक्ष तरी सुखकर हॊइल. गुरूंची थोडी सेवा तरी होइल. मनाला समाधान तरी मिळेल म्हणूनच सांगतो
मुखी नाम स्वामींचे, मनी ठेवा भाव l
कुणालाही नको लळा, फक्त मज सद्गुरु ठाव. ll
मी काही कुणी लेखक नाही जे मनात आल ते लिहिले
मी काही कुणी लेखक नाही जे मनात आल ते लिहिले
रितेश रवींद्र वेदपाठक.
( स्वामी भक्त )
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ������
ReplyDelete