Friday, December 29, 2017

खडतर आयुष्य

कधी कधी आयुष्य खूप खडतर वाटेवर जगले जाते, मी मी म्हणणारे बऱ्याच वेळा शेपूट घालून बसलेलं पाहिले आहे. सर्वांना वाटते की माझेच अस कस झालं? मीच का या सगळ्यात, अजून किती सहन करू, माझे भोगच असतील हे कशावरून? असे एक ना अनेक प्रश्न असतात डोक्यात.

माझ्या जागेवर बसून बघा एक एक असे विषय असतात,की ते पाहिलं की आपले बर चालले आहे असे वाटतं, कोण कुठची एक आई तिच्या लेकी सहित नातीला घेऊन आली. लेकीचं पाहिले लग्न मोडले, दुसरे केले तर वर्षभराच्या आतच नवरा पोटात पोर असताना देहच सोडून गेला, नंतर सासू सासऱ्यांनी पैसा लुटला आणि हिला घराबाहेर केले, आता तिची लेक 5 वर्षाची झाली ही कहाणी सांगताना आजी ढसाढसा रडत होत्या.
लेकीची मानसिक स्थिती ढासळली सर्व बाजुंनी हरली, लढावेसे वाटते म्हणाली पण परिस्थिती अशी आहे की लोक जगू देत नाही. प्रत्येक जण फक्त वापर करतो आणि त्यांची वेळ निघाली की फेकून देतो.

कहाणी घर घर की आहे, पण आजींना स्वामींवर विश्वास आहे, कर्म आड येते हे मान्य आहे पण महाराज आहेत न्याय करायला असे त्या आजी म्हणतात, खरे आहे ते पटते मनाला. पण कर्माचा सिद्धांत कोणालाही सोडत नाही, योग्य वेळी तुमच्या नशीबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळनार, पण तो पर्यंत तठस्थ भूमिका घ्यावी लागते, मानसीक त्रास सहन करीत योग्य मार्गाने चालत राहिलो तर महाराज हाक नक्कीच ऐकणार, किती दिवस अजून सहन करू? याचे उत्तर माझ्याकडे देखील नव्हते, कारण योग्य वेळ आली की ती उत्तरं त्यांना मिळणार, तोपर्यंत शांतपणे 5 वर्षाच्या लेकीसाठी जग हाच सल्ला मी दिला......


मन हेलवणारे क्षण असतात कधीकधी,
सुचत नाही काही, बुद्धी मठ्ठ होते,
मी, माझे, माझंच करणाऱ्यांना सांगावेसे वाटतं, कधीतरी अश्या लोकांचा विचार करा. नुसत्या विचारांनीच तुम्ही उदास व्हाल, तर प्रत्यक्ष ती परिस्थिती जगणाऱ्या त्या देहाचे आणि मनाचे काय हाल होत असतील? विचार देखील करवत नाही.

सांगण्याचे उद्दीष्ट इतकेच की, आपली परिस्थिती या माऊलीच्या परिस्थिती सोबत जुळवा, आपली वेळ कित्येक पटीने चांगली आहे म्हणुन जगण्यासाठी स्वामीकृपेने बळ मिळेल..........

योग्य वेळ लवकर येवो, आणि अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व स्वामीभक्त स्वतःच्या असलेल्या विपत्तीतून बाहेर येवो हीच या खुळ्या स्वामीभक्ताची महाराजांच्या आणि गिरनारीच्या चरणी प्रार्थना...
श्री स्वामी समर्थ
स्वामीभक्त(खुळा)

Wednesday, December 20, 2017

नाद खुळा रे नाद खुळा गीरनारी नामाचा नाद खुळा.....

दत्त नाम हे मुखी घेऊनि स्वामी गातो तव चरणी,
हे दिन दयाळा संरक्षण द्या तव उदरी,
कलीचा हा महिमा भयंकर पण शेवट आहे सत्याचा,
आस आहे मनी तव भेटीची करुणा भाकतो गुरुरायाची....

स्वस्त बसावे ध्यान लागावे मस्तीत तुझ्या मी रंगून जावे,
मुखी घ्यावे नाम दत्ताचेच ध्यान मन माझे हरवून जावे,
लाडाचा मी रे खुळा तुझा तू ना शब्द माझा वाया करी,
धाव घेई मी दहा हजार पायऱ्यांवरी मिठीत घेई मज गिरनारी....

नाव तुझे रे गिरनारी सर्व श्रेष्ठ तू गुरुवर्य अवधुत अवतारी,
नाद खुळा तुझा जनजीवा लागे पितांबर तुझं अंगी बहू साजे,
कमंडलू तव हाती आहे तहानलेली जनता तूच गंगेद्वारे सुखावे,
पायी खडावा गर्जती नाद त्याचा आमुचे कानी गुंजती....

महादेव तू ब्रम्हानंदी ब्रम्ह कमळी तू दर्या सागरी विष्णु रूप तू,
मद मस्त तू साधनेचा राजा सर्वलोकी तुझाच गाजावाजा,
सर्वसिद्ध तव पदी नाचे तुझ्या मनी मात्र मी अति विराजे,
नाद खुळा रे नाद खुळा गीरनारी नामाचा नाद खुळा.....

श्री स्वामी समर्थ,
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी...

आपला,
स्वामीभक्त(खुळा)
श्री. रितेश रविंद्र वेदपाठक.

Tuesday, December 19, 2017

जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी...

जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी

दहा हजार पायऱ्या चढतांना बऱ्याच जणांना सर्वात पहिले डोळ्यासमोर अंधारच येतो, इतक्या पायऱ्या आपण कसे चढणार? यातच अर्धे खचून जातात, त्यापेक्षा नामस्मरण करत चढतांना खूप मजा येते.
दत्त पादुकांचे दर्शन मन मोहून जाते, दत्त धुनीचा मंद सुवास शरीरातला सर्व थकवा घालवून टाकतो, आजूबाजूचा डोंगररांगांचा परिसर तिथेच बैठक मारायला भाग पाडतो. परंतु अशा अवस्थेत तिथे बसणेही मुश्किल, लोक आपल्याच पाया पडायला रांगा लावतात, आणि मग तेथून पळ काढावा लागतो.......

दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेलं असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मलातरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा गिरनार ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला, आणि आजही पुरवत आहेत, बरीच मंडळी मागे लागतात की आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत घ्या, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही? अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्व कष्टाच्या साधनेने, उगाच ओढून- ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्वाची, नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही, भले- भले संत- महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते, मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जाते. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही, दहा वेळा बजावून देखील ऐकले नाही की सळो को पळो करणार आणि अक्कल आली की सरळ रेषेत आणणार. तो पर्यंत वेळ जातो आणि कष्ट खूप करावे लागतात, पण पर्याय नसतो. म्हणूनच वेळेवर योग्य वागणे गरजेचे आहे.सरळ साधे नाम घ्यावे, त्याच रंगी रंगावे आणि समाधान मानावे, परमार्थ त्यातच मिळतो, उगाच मला हवेच म्हणून काहीच मिळणार नाही उलट हातातले गमवायची येते. त्यापेक्षा मिळेल ते घेऊन जपले तर कृपा वर्षाव अनंत कृपेने रहातो.

पिछे ना आ मेरे यारा, हमारे हाथ कूछ भी नही,
हमतो वो फकीर है जीसकी झोली भी खाली है,
हमतो कुछ भी नही स्वामी ही खिलाडी है ll
बाबाके खेल बाबाही जाने हमतो उसके बिघडे शेहजादे.....

आपला,
स्वामी नामी बिघडलेला
स्वामीभक्त(खुळा)
रितेश रविंद्र वेदपाठक.
🚬जय शंकर

Sunday, September 3, 2017

खुप सोपे असते एखाद्याला महान करणे, एखाद्याच्या पायावर डोके ठेवण्याची ईच्छा व्यक्त करणे, त्या मागची साधना आपण किती लक्षात घेतो? साधना करणे इतकेही सोपे नसते ना? त्या साधकाला कित्येक परीक्षांना सामोरे जावे लागते, घर- दार सोडावे लागते, संसारिक गरजा भागवताना त्याची झालेली तारेवरची कसरत कोणीच पाहू शकत नाही, त्यांच्या आई- वडीलांची झालेली तळमळ कधी पहिली आहे का? , त्याच्या बायकोने त्याचा चालवलेला संसार कधी समोरून पहिला आहे का? नाही शक्यच नाही. एखाद्याला महान ठरवणे सोपे असते पण त्याच्या सारखे स्वतःला घडवणे मुश्किल. तोंड दाबून प्रचंड बुक्क्यांचा मार सहन करायची कोणाचीच हिम्मत नसते, घरचे दाखवायला सोबत असतात पण किती समजून घेतात? अजिबात नाही. पण ही सर्व त्याला घडवण्यासाठी झालेली परीक्षा असते, दुनियेच्या नजरेत तो महान असतो पण त्यामुळे त्याच्या घरच्यांना झालेला त्रास कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? नाही कोणी समजून घेणारच नाही. त्यांनाही वाटत असणार आपला माणूस हरवतोय म्हणून, पण महाराजांनी काही निराळेच ठरवलेलं असते हे त्यांना नाही समजत, प्रेमाने त्यांना आंधळं केलेलं असतं. बाहेरून मिळणारी ईज्जत कधीकधी त्याच्या साधनेमुळे आपल्या माणसांना दिलेल्या त्रासामुळे त्याला सहन होत नाही, पण हे त्याच्या घरच्या माणसांना कळत नाही ना. त्याच्यात होणारे बदलावं म्हणजे कोणाच्या तरी तालावर हा नाचतो आहे हे देखील त्याला ऐकावे लागते, बाहेरचे  लोक बोलतात तेव्हा ऐकता ना मग माझेही ऐका म्हणणारी त्याची पत्नी जेव्हा त्याचे क्लास घेते तेव्हा तो काय उत्तर देणार?
    असो या सगळ्याचा होणार त्रास सहन करत साधने कडे जोर देत पुढे जावेच लागते , त्यावेळी कोणत्याही भावानेसाठी जागा नसते, एका वेगळ्या विश्वात त्याची जागा बनलेली असते गरज असते ती त्याचे ते विश्व समजण्याची, त्या भावना समजण्याची त्याच्या घरच्यांनी त्याला समजण्याची, बाहेरील विश्व विसरून अध्यात्मिक विश्वात मदत करण्यासाठी. त्या साधकाची साधना त्याची एकट्याची नसते त्याच्या सर्व परिवाराची असते, आई- बाबा, बायको, भाऊ-बहीण, मुलांची, मित्रांची व त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचीच असते, कारण या सर्वांनाच कुठेतरी सहन करावे लागते, सर्वांनाच परीक्षा द्यावी लागते, त्याला केलेला नमस्कार हा त्याच्या त्या सर्व सोबत्यांना देखील असतो, त्यांच्याही सेवेला असतो, त्या सर्वांच्या सेवेला मानाचा मुजरा......
         एक वेळ असते जिथे शांत राहण्याचीच गरज असते, पण सहज साधनेत लोकांना समजतच नाही वैव्यक्तिक भावनेत वाहून जातात, खरे- खोटे समजत नाही त्यामुळे नको त्या विषयांकडे वळत नामस्मरणाचा प्रभाव कमी पडतो, इतर विषय डोक्यात फिरायला लागतात, हे असे का? तसे का? या विषयात गुंतवतात. सर्व सोडून नामस्मरणाचा आस्वाद घ्यायचा. समोरचा साधक खरंच साधक आहे की नाही हे ओळखण्यासाठी स्वतः साधक बना, स्वतः मेहनत करा, आणि साधकाचे गुण समजून घ्या.....

स्वामी,दत्त आणि गुरुतत्व एकच आहे
नामाचा आनंद घ्या , स्वामींच्या सानिध्यात खूप अनुभव येतात आजच्या कलियुगात तेच सर्व प्रकारे आपल्याला सांभाळतात, पण कलीचा महिमा आहे त्यामुळे साधना प्रत्येकाला जमत नाही, म्हणून ज्योतिष शास्त्राचा वापर अनिवार्य आहे, साधनेच्या जोरावर सर्वांवर मात करता येते, तोपर्यंत एका आधाराची गरज लागतेच. योग्य साधना सुरू होऊन योग्य मार्गी लागली की स्वामी संपूर्ण रुपात सांभाळतात. पदवीधर होण्यापूर्वी अनेक परीक्षा द्याव्या लागतात त्यावेळेस गाईड हे वापरावेच लागते अगदी तसेच स्वामी योग्य साधना घडवताना आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ईतर मार्ग वापरावेच लागतात.

श्री स्वामी समर्थ

स्वामीभक्त,
श्री रितेश रविंद्र वेदपाठक.

Friday, August 18, 2017

वाट दाखविणारा गुरू

एक पेन चुक करू शकतो पण,एक पेन्सील कधीच चुक करत नाही कारण,तीचा पार्टनर (खोडरबर)तीच्या सोबत असतो. तो तिच्या सर्व चुका सुधारतो...
आपल्या सामान्य मानवाच्या जीवनाचे देखील असेच पेनासारखे झाले आहे, आपण चुकांवर चुका करत जातो पण, त्या समजवायला आपल्याला कान धरणारे कोणीच नाही. दिवसेंदिवस आपण we are well educated म्हणत we are much matured करत बसतो, त्यात आपल्याला कोणीही समजावत नाही, किंबहुना आपण कोणालाही समजूनच घेत नाही.
म्हणुनच जीवनात आपल्याला एक तरी खोडरब्बर हवा पण गुरु रुपात, जो आपल्या चुका सुधारेल, योग्य वाट दाखवेल, परंतु हल्ली बरेच जणं गुरूच्या शोधात असतात, मला गुरू हवा, मला गुरू हवा करत बोंबलत असतात. त्याचा परिणाम म्हणुन ऐरे- गैरे येतात आणि त्यांचा फायदा उचलतात, ज्यांना स्वतःचा रस्ता माहीतच नाही ते इतरांना काय रस्ता दाखवणार?
   तुम्हाला जर योग्य गुरू हवा असेल तर एकच सोप्पा मार्ग आहे, तो म्हणजे "नामस्मरण." स्वतःला नामस्मरणात इतके घोळून घ्या ना की स्वतः साक्षात परब्रम्ह समोर आला पाहिजे तुमच्यासाठी. तुम्ही का शोधता गुरू? आपली लायकी इतकी बनवायची ना की गुरुच आपल्याकडे आले पाहिजे. बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकले आहे की , सध्याच्या जगात सदेह रुपात गुरू असावा, मग हा जो सदेहरूपी गुरू आहे तो योग्य की अयोग्य हे कोण सांगणार? आपल्याला अजून धड बोलताही येत नाही काही ज्ञानच नाही तर योग्य अयोग्य आपण काय सांगणार? म्हणजे जर समोरचा तोतया निघाला तर? गेला वेळ वाया? त्यापेक्षा सोडा त्या सदेहरूपी गुरूला. नामस्मरणात वेळ दवडा तुमचा खोडरब्बर स्वतः येईल समोरून, त्या पेन्सिलीला सुद्धा कागदावर उमटण्या अगोदर स्वतःला झिजवावेच लागते, तेव्हा कुठे योग्य- अयोग्याची जाण येते आणि खोडरब्बर त्याचा गुणधर्म दाखवतो.....
      या सर्वाचा अट्टाहास इतकाच की भले-भले आले आणि गेले पण नामस्मरण  हेच सर्वांचे साधन होते, नामस्मरणाला कसलेही बंधन नाही, कुठेही करा, कितीही करा, कसेही करा काहीही हरकत नाही, आणि Result Gaurented......

बघा किती हजम होतेय ते, सांगायचे कर्तव्य केले बाकी महाराजांची ईच्छा...
श्री स्वामी समर्थ....

श्री. रितेश रविंद्र वेदपाठक
स्वामीभक्त(खुळा)
8421132224

Saturday, July 15, 2017

गिरनारि तेरा रंग न्यारा, बस तेरा ही सहारा

ll जय गिरनारि, तेरा भरोसा है भारी ll

आज 15 जुलै 2017....
कामत भाऊंनी जुन्या आठवणी आठवण करून दिल्या आणि सहज काही लिहायचा मुड झाला.....
2015 फेब्रुवारी मध्ये कामतांनी मला केणे काकांचे "दिव्यत्वाची जेथे प्रचिती" हे पुस्तक भेट दिले, पुस्तक वाचून झाल्यावर डोक्यात एक भुंगा लागला आपल्याला एकदातरी गिरनारला जाता येईल का? आणि अचानक दोन दिवसांनी एक व्यक्ती म्हणाली "आपण जाऊ गिरनारला मी घेऊन जाईन तुम्हाला"..... मनात म्हटले वा! क्या बात है? आपल्याला जायला मिळेल, कसलं काय? महाराज माझ्या मनाशी खेळत होते, कसून परीक्षा घेत होते. जणू बाजारातून नारळ खरेदी करतोय आणि 10 वेळा वाजवून बघतोय.....
ती व्यक्ती दर चार दिवसांनी म्हणायची "आपण जाऊया गिरनारला मी नेईन", त्याचा मी पणाच कदाचित आड येत होता, माझी मात्र वाट लागली होती डोक्याची मनात गिरनार दिसत होते. अशातच मे महिन्यात कामत भाऊंचा फोन आला, "जून मध्ये वसईतून एक ग्रुप जातोय गिरनारला येतोस का?" ताबडतोब हो म्हंटलं, झालं बुकिंग झाली, हळूहळू गिरनारचे वेड लागत होते जाण्याचे, जशी तारीख जवळ आली आदेश झाला, वरती सोवळ्यात ये...गिरनारला जाणे झाले.....
वरती चढताना महाराजांनी पूर्ण कस काढला, हळूहळू वर चढताना जणू आयुष्यातल्या सर्व पापाचे पाढे दीसायला लागले, नामस्मरण करत करत दहा हजार पायऱ्यांवर पोहोचलो , महाराजांना नमस्कार केला व परत निघतांना म्हणालो," बाबारे तुला काय काम धंदा नाही? तुम्ही वाऱ्याच्या वेगाने क्षणात इथे तर क्षणात तिथे" वाट आमची लागते "दहा हजार पायऱ्या पुन्हा चढण्याची ताकद माझ्यात नाही तेव्हा हा पुन्हा नमस्कार🙏 आता पुन्हा येणार नाही."
कसलं काय? सहा महिन्यात पुन्हा जाणे झाले पुन्हा नव्याने सुरवात, पुन्हा बाबाने बँड वाजवला. कसा येत नाही बघतो, नंतर नुसता धावता केलं. पण एक गोष्ट जाणवली जितक्या वेळा गिरनारला गेलो प्रत्येक वेळी तो नवीन होता, आता तर काय? महाराज बोलावतात आणि आम्ही पळतो.
महाराजांचे खेळ आणि माझे भोग महाराजांनी मस्त खेळले... प्रत्येक वेळी श्री. आनंद अजित कामत हे साक्षी म्हणून होतेच, अगदी प्रत्येक चमत्कार/ साक्षात्कार कामत भाऊंनी जवळून पहिला आहे, सदेह रुपात महाराजांनी गिरनारला त्यांना आवर्जून लिंबूसरबत दिले होते. त्यांची धार्मिक सेवा असणे यात वादच नाही, माझ्या बरोबर गिरनारला येताना प्रत्येक वेळी त्यांना मानसिक, शारीरिक परीक्षेला सामोरे जावे लागले पण त्यांनी जिद्द सोडली नाही आजही ते कायम माझ्या पाठीशी आहेत.

श्री. आनंद कामत यांच्या स्वामीभक्तीला त्रिवार नमन🙏🙏🙏

श्री स्वामी समर्थ
आपला स्वामीभक्त,
रितेश रविंद्र वेदपाठक.
08421132224

Friday, July 7, 2017

     कोणीतरी म्हणाले तू छान लिहितोस, असाच लिहीत जा, पण त्यांना काय सांगू मी नाही माझा बाप लिहून घेतो म्हणून.असतात एक-एक हौशी तर कधी असतात काही नवशिके त्यांच ठीक आहे हो पण जी पिकलेली पाने आहेत त्यांचे काय? अध्यात्म म्हटले की लागले नाचायला.....
परवाच एक जोडपं आलं भेटायला, नवरा नोकरी करतो बायको घर सांभाळते पदरात दोन मुली, म्हणाले कसंबसं घर चालवतोय कधी-कधी नोकरीचा भरोसा नसतो, मी म्हणालो मग? म्हणाले मी स्वामींच करतो तरी त्रास होतो. मी सहज विचारले तुम्ही स्वामिंच करता म्हणजे नेमकं काय करता? ते म्हणाले रोज पोथ्या वाचतो, स्तोत्र म्हणतो, रोज 3 ते 4 तास पूजा करतो. मी म्हणालो बार रे इतके करता? ते म्हणाले हो ना, तरीही त्रास कमी होत नाही. त्यावर मी काय बोलणार? भोग आहेत ते भोगायला हवेत ना? तुम्ही जे करताय ते थांबवा, आणि फक्त नामस्मरण करा त्यांना नामाचे महत्व समजावले पुढे स्वामींची ईच्छा......
हल्ली लोकांना म्हणे नामस्मरण करायला वेळ नसतो, पण मग TV  वरच्या फालतू serial's बघायला बरा वेळ मिळतो, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता सर्वांना स्वतंत्रता हवी आहे परिवाराची कोणालाही काळजी नाहीच.

समाज बिघडत चाललाय आणि आमचे समाज सुधारक झोपा काढतायत स्वतःचे खिसेे भरणे हे त्यांचे महत्वाचे काम, आम्ही हे केले आम्ही ते केले यातच यांचा वेळ जातो. आम्ही हॉस्पिटल उभे केले पण त्यात कोणी येत नाही, मग तुम्ही घ्या ना पुढाकार जिथे गरज वाटतेय तिथे तुम्ही स्वतः जा.  बाबा आमटे बघा कसे राहिले आणि तुम्ही बघा कसे रहाताय? असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण नामात खुप शक्ती आहे, नामाला कसलेही बंधन नाही करा नामस्मरण मस्त मजेत बघू कश्या अडचणी येतात.... बाकी महाराजांवर सोडा महाराज जसे ठेवतील तसे राहण्याची तयारी ठेवा, तारा किंवा मारा पण महाराज आम्हाला सोडू नका असे म्हणून स्वतःला समर्पण करा मग बघा महाराज कशी काळजी घेतात तुमची.
बाकी मला काही येत नाही जे महाराजांनी लिहून घेतले ते लिहिले.

श्री स्वामी समर्थ
रितेश र. वेदपाठक

Saturday, March 18, 2017

त्रिमुर्ती जेम्स

"त्रिमुर्ती जेम्स" विनामुल्य मार्गदर्शनाचे कार्य गेले 6 वर्षे, कालीयुगातील तारक, मारक, संहारक श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने करीत आहे.
महाराजांच्या आशिर्वादाने खुप जणांना योग्य दिशा म्हणा किंवा सुचना म्हणा एक माध्यम म्हणुन आम्ही सदैव करत होतो, करत आहोत आणि करत राहणार, या पैशांच्या व्यापार असलेल्या दुनियेशी आमचा संबंध नाही. अशातच महाराजांनी 12 वेळा गिरनार वारी घडवुन आणली, प्रत्येक वेळेचा निराळा अनुभव, आणि निराळी विभुती, अप्रतिम असे सौंदर्य आणि मनमोहक प्रतिबिंब असलेल्या गिरनारवर इतकं प्रेम जडलयं ना ,कि त्याला उपमाच नाही. दहा हजार पायऱ्या कश्या संपतात हेच कळत नाही, दत्तमहाराजांची मुर्ती अक्षरशः प्रेमात पाडते, एखादे लहान मुलं जसं आई-बापाने उचलुन घ्यावं म्हणुन हात वर करून हट्टाने उभे रहाते आणि मग आई - बाप लाडाने घट्ट मिठीत घेतात ना, अगदी तसच गिरनारच्या पहिल्या पायरीवर उभं राहुन करायचं. बघु कसा त्या बापाला लेकराचा पुळका नाही येत? अनोख्या अनुभवांच्या गाठोड्यांबरोबर असंख प्रेम त्या बापाने दिले आहे, समाजाला उत्तम रस्ता दाखवण्याचे कार्य दिल्या बद्दल माय माउली श्री स्वामी समर्थांचे शतशः आभार 🙏
     त्रिमुर्ती या आमच्या बॅनरखाली असंख्य जनमानस आजही मोफत सल्ला घेण्यासाठी येतात, जे दिलेला सल्ला पाळतात त्यांना फायदाही होतोच, अर्थात साक्षात महाराजांचा शब्दच आहे, तो पाळला कि मार्ग सापडणारच. साधना आणि महाराजांचे प्रेम हे गणित छान जमलंय, कधीही कोणतीही अडचण असो आम्हाला सांगा महाराज योग्य रस्ता दाखवतील हि खात्री (सांगितलेल्या मार्गाने गेलात तरंच).

समस्या तुमची, उत्तर स्वामींचे,
सर्व प्रयत्न करून थकलात, तरीही लाभ मिळत नाही?
तुमच्या सर्व समस्यांचे समाधान

पत्ता: त्रिमूर्ती जेम्स, शॉप नं:-7,
साई प्रल्हाद, तुंगारेश्वर स्वीट्सच्या मागे,
वसई स्टेशन पासुन 2 मिनिटांच्या अंतरावर,
वसई पश्चिम 401202

आपला,
स्वामीभक्त (खुळा)
08421132224
09757069692

Saturday, January 21, 2017

श्री स्वामी समर्थ
इ.स.१८७० पासुन श्री स्वामीसुत महाराज प्रस्थापित श्री स्वामी महापर्वणी, म्हणजेच श्रींच्या पादुकांचा पारंपारिक समुद्रस्नान(अभिषेक) सोहळा हा या वर्षी फाल्गुन शु. द्वितीया- मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी आहे हे ऐकुन खुप आनंद झाला.
रविवार दिनांक ८ जानेवारी २०१७ रोजी याच उत्सवाची नांदी म्हणुन स्वामींवर शर्कराभिषेक झाला, खुप प्रसन्न वाटले.मी सपत्नीक या सोहळ्याला उपस्थित होतो.

गेल्या वर्षीपर्यंत मला या उत्सवाची पुसटशी देखील कल्पना नव्हती, या उत्सवाला गेल्या ११ वर्षांपासुन वसई(प) येथील श्री. पांडुरंग हरि भजन मंडळ हे गेली ११ वर्षे सातत्याने भजन सेवा करतात हे मला कानावर आले. २०१६ च्या उत्सवाला येणार का? अशी विचारणा मला एका मित्राने केली, संमति दर्शवताच त्यालाही आनंद झाला. स्वामींच्या उदंड प्रेमाचा अनुभव त्यावेळी मला झाला, हा अनुभव शेअर करण्याची आज महाराजांकडुन अनुमती मिळाली.

फाल्गुन शु. द्वितीया- गुरुवार, दिनांक १० मार्च २०१६ रोजी, काळाराम मंदिरातील ठाकुरदास बुवा स्थापित श्री स्वामी समर्थ मठातुन महाराजांची स्वारी गिरगांव चौपाटीकडे निघाली, पालखी मंदिरातुन बाहेर निघतच होती, भजनी मंडळी भजनामध्ये गर्क होती त्यातच मी देखील होतो अचानक एक आवाज आला, मिलिंदच्या अंगावर उपरणे घाल. तेव्हा लक्षात आले, माझ्या जवळील बॅगेत पिठापुरम येथील संस्थानाचे प्रसाद रुपात मिळालेले उपरणे आहे. मी ते घेतले व थेट मिलिंद पिळगांवकर यांचे जवळ गेलो, ते पायघड्या घालण्यात व्यस्त होते. तिथेच त्यांना हाक मारली आणि महाराजांनी हे द्यायला सांगितलंय असे म्हणालो त्यांनी त्या प्रसादाचा स्वीकार केला, पुढे पालखी पुन्हा मंदिरात येई पर्यंत ते उपरणे मिलिंद दादा यांच्या खांद्यावरच होते.
समुद्र स्नानाच्या वेळी आत समुद्रात ठराविक मंडळीच जाणार होती, मी व माझे एक मित्र यांना देखील आत जायला मिळाले होते मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आपल्याला आत जायला मिळतंय म्हणुन पण, नो बॉलवर षटकार ठोकावा अशी संधी मिळाली आणि आनंदाला सीमाच उरली नाही, चंद्रकांत मेस्त्री दादा यांनी समुद्र स्नान ज्या मुर्तीवर होत होते ती मुर्ती माझ्या हातात ठेवली, पादुकाही हातात मिळाल्या स्वामींच्या लीला पहिल्या आणि पुढे मी नि:शब्द..........

एक वर्ष लोटत आले २०१७ च्या समुद्रस्नान सोहळ्याची तयारी सुरु झाली, शर्कराभिषेक झाला, आज दिनांक २१जानेवारी २०१७, एक स्वप्न पाहुन खडखडीत जागा झालो आजुबाजुला मेस्त्री दादांना शोधत होतो, पण समोर ते नव्हते तेव्हा भानावर आलो की मी स्वप्न बघत होतो घड्याळ पहिले तर (ब्रम्हमुहूर्त) पहाटेचे ३ वाजले होते , अचानक एक आवाज आला "चंद्रकांत आणि मिलिंदला म्हणावं निमंत्रण मिळाले" तेव्हा स्वप्न आठवले ते असे होते
मी माझ्या वसई(प) येथील कार्यालयात आलो असता तेथे श्री.चंद्रकांत मेस्त्री हे उपस्थित होते, महाराजांना निमंत्रण देण्यास आलो असे ते म्हणाले (माझ्या कार्यालयात स्वामींचा दरबार मांडलेला आहे), फाल्गुन शु. द्वितीया- मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी होणाऱ्या सोहळ्याचं ते निमंत्रण होते. झोप उडाली आणि समजलं की ते स्वप्न नव्हतं तर मिलिंद पिळगांवकर आणि चंद्रकांत मेस्त्री यांनी दिलेल्या आमंत्रणाचं महाराजांनी दिलेलं प्रतिउत्तर होत. महाराजांच्या असंख्य लीला ना तेव्हा कोणाला समजल्या ना आत्ता पुन्हा मी नि:शब्द.......

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

जे लिहिले ती प्रेरणा, ते एकुण एक शब्द महाराजांचे, आम्ही नेहमीच नाममात्र...

आपला,
स्वामीभक्त(खुळा) वसई (प)
रितेश रविंद्र वेदपाठक.
०८४२११३२२२४/ ०९७५७०६९६९२