Friday, July 7, 2017

     कोणीतरी म्हणाले तू छान लिहितोस, असाच लिहीत जा, पण त्यांना काय सांगू मी नाही माझा बाप लिहून घेतो म्हणून.असतात एक-एक हौशी तर कधी असतात काही नवशिके त्यांच ठीक आहे हो पण जी पिकलेली पाने आहेत त्यांचे काय? अध्यात्म म्हटले की लागले नाचायला.....
परवाच एक जोडपं आलं भेटायला, नवरा नोकरी करतो बायको घर सांभाळते पदरात दोन मुली, म्हणाले कसंबसं घर चालवतोय कधी-कधी नोकरीचा भरोसा नसतो, मी म्हणालो मग? म्हणाले मी स्वामींच करतो तरी त्रास होतो. मी सहज विचारले तुम्ही स्वामिंच करता म्हणजे नेमकं काय करता? ते म्हणाले रोज पोथ्या वाचतो, स्तोत्र म्हणतो, रोज 3 ते 4 तास पूजा करतो. मी म्हणालो बार रे इतके करता? ते म्हणाले हो ना, तरीही त्रास कमी होत नाही. त्यावर मी काय बोलणार? भोग आहेत ते भोगायला हवेत ना? तुम्ही जे करताय ते थांबवा, आणि फक्त नामस्मरण करा त्यांना नामाचे महत्व समजावले पुढे स्वामींची ईच्छा......
हल्ली लोकांना म्हणे नामस्मरण करायला वेळ नसतो, पण मग TV  वरच्या फालतू serial's बघायला बरा वेळ मिळतो, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता सर्वांना स्वतंत्रता हवी आहे परिवाराची कोणालाही काळजी नाहीच.

समाज बिघडत चाललाय आणि आमचे समाज सुधारक झोपा काढतायत स्वतःचे खिसेे भरणे हे त्यांचे महत्वाचे काम, आम्ही हे केले आम्ही ते केले यातच यांचा वेळ जातो. आम्ही हॉस्पिटल उभे केले पण त्यात कोणी येत नाही, मग तुम्ही घ्या ना पुढाकार जिथे गरज वाटतेय तिथे तुम्ही स्वतः जा.  बाबा आमटे बघा कसे राहिले आणि तुम्ही बघा कसे रहाताय? असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण नामात खुप शक्ती आहे, नामाला कसलेही बंधन नाही करा नामस्मरण मस्त मजेत बघू कश्या अडचणी येतात.... बाकी महाराजांवर सोडा महाराज जसे ठेवतील तसे राहण्याची तयारी ठेवा, तारा किंवा मारा पण महाराज आम्हाला सोडू नका असे म्हणून स्वतःला समर्पण करा मग बघा महाराज कशी काळजी घेतात तुमची.
बाकी मला काही येत नाही जे महाराजांनी लिहून घेतले ते लिहिले.

श्री स्वामी समर्थ
रितेश र. वेदपाठक

No comments:

Post a Comment