Saturday, July 15, 2017

गिरनारि तेरा रंग न्यारा, बस तेरा ही सहारा

ll जय गिरनारि, तेरा भरोसा है भारी ll

आज 15 जुलै 2017....
कामत भाऊंनी जुन्या आठवणी आठवण करून दिल्या आणि सहज काही लिहायचा मुड झाला.....
2015 फेब्रुवारी मध्ये कामतांनी मला केणे काकांचे "दिव्यत्वाची जेथे प्रचिती" हे पुस्तक भेट दिले, पुस्तक वाचून झाल्यावर डोक्यात एक भुंगा लागला आपल्याला एकदातरी गिरनारला जाता येईल का? आणि अचानक दोन दिवसांनी एक व्यक्ती म्हणाली "आपण जाऊ गिरनारला मी घेऊन जाईन तुम्हाला"..... मनात म्हटले वा! क्या बात है? आपल्याला जायला मिळेल, कसलं काय? महाराज माझ्या मनाशी खेळत होते, कसून परीक्षा घेत होते. जणू बाजारातून नारळ खरेदी करतोय आणि 10 वेळा वाजवून बघतोय.....
ती व्यक्ती दर चार दिवसांनी म्हणायची "आपण जाऊया गिरनारला मी नेईन", त्याचा मी पणाच कदाचित आड येत होता, माझी मात्र वाट लागली होती डोक्याची मनात गिरनार दिसत होते. अशातच मे महिन्यात कामत भाऊंचा फोन आला, "जून मध्ये वसईतून एक ग्रुप जातोय गिरनारला येतोस का?" ताबडतोब हो म्हंटलं, झालं बुकिंग झाली, हळूहळू गिरनारचे वेड लागत होते जाण्याचे, जशी तारीख जवळ आली आदेश झाला, वरती सोवळ्यात ये...गिरनारला जाणे झाले.....
वरती चढताना महाराजांनी पूर्ण कस काढला, हळूहळू वर चढताना जणू आयुष्यातल्या सर्व पापाचे पाढे दीसायला लागले, नामस्मरण करत करत दहा हजार पायऱ्यांवर पोहोचलो , महाराजांना नमस्कार केला व परत निघतांना म्हणालो," बाबारे तुला काय काम धंदा नाही? तुम्ही वाऱ्याच्या वेगाने क्षणात इथे तर क्षणात तिथे" वाट आमची लागते "दहा हजार पायऱ्या पुन्हा चढण्याची ताकद माझ्यात नाही तेव्हा हा पुन्हा नमस्कार🙏 आता पुन्हा येणार नाही."
कसलं काय? सहा महिन्यात पुन्हा जाणे झाले पुन्हा नव्याने सुरवात, पुन्हा बाबाने बँड वाजवला. कसा येत नाही बघतो, नंतर नुसता धावता केलं. पण एक गोष्ट जाणवली जितक्या वेळा गिरनारला गेलो प्रत्येक वेळी तो नवीन होता, आता तर काय? महाराज बोलावतात आणि आम्ही पळतो.
महाराजांचे खेळ आणि माझे भोग महाराजांनी मस्त खेळले... प्रत्येक वेळी श्री. आनंद अजित कामत हे साक्षी म्हणून होतेच, अगदी प्रत्येक चमत्कार/ साक्षात्कार कामत भाऊंनी जवळून पहिला आहे, सदेह रुपात महाराजांनी गिरनारला त्यांना आवर्जून लिंबूसरबत दिले होते. त्यांची धार्मिक सेवा असणे यात वादच नाही, माझ्या बरोबर गिरनारला येताना प्रत्येक वेळी त्यांना मानसिक, शारीरिक परीक्षेला सामोरे जावे लागले पण त्यांनी जिद्द सोडली नाही आजही ते कायम माझ्या पाठीशी आहेत.

श्री. आनंद कामत यांच्या स्वामीभक्तीला त्रिवार नमन🙏🙏🙏

श्री स्वामी समर्थ
आपला स्वामीभक्त,
रितेश रविंद्र वेदपाठक.
08421132224

Friday, July 7, 2017

     कोणीतरी म्हणाले तू छान लिहितोस, असाच लिहीत जा, पण त्यांना काय सांगू मी नाही माझा बाप लिहून घेतो म्हणून.असतात एक-एक हौशी तर कधी असतात काही नवशिके त्यांच ठीक आहे हो पण जी पिकलेली पाने आहेत त्यांचे काय? अध्यात्म म्हटले की लागले नाचायला.....
परवाच एक जोडपं आलं भेटायला, नवरा नोकरी करतो बायको घर सांभाळते पदरात दोन मुली, म्हणाले कसंबसं घर चालवतोय कधी-कधी नोकरीचा भरोसा नसतो, मी म्हणालो मग? म्हणाले मी स्वामींच करतो तरी त्रास होतो. मी सहज विचारले तुम्ही स्वामिंच करता म्हणजे नेमकं काय करता? ते म्हणाले रोज पोथ्या वाचतो, स्तोत्र म्हणतो, रोज 3 ते 4 तास पूजा करतो. मी म्हणालो बार रे इतके करता? ते म्हणाले हो ना, तरीही त्रास कमी होत नाही. त्यावर मी काय बोलणार? भोग आहेत ते भोगायला हवेत ना? तुम्ही जे करताय ते थांबवा, आणि फक्त नामस्मरण करा त्यांना नामाचे महत्व समजावले पुढे स्वामींची ईच्छा......
हल्ली लोकांना म्हणे नामस्मरण करायला वेळ नसतो, पण मग TV  वरच्या फालतू serial's बघायला बरा वेळ मिळतो, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता सर्वांना स्वतंत्रता हवी आहे परिवाराची कोणालाही काळजी नाहीच.

समाज बिघडत चाललाय आणि आमचे समाज सुधारक झोपा काढतायत स्वतःचे खिसेे भरणे हे त्यांचे महत्वाचे काम, आम्ही हे केले आम्ही ते केले यातच यांचा वेळ जातो. आम्ही हॉस्पिटल उभे केले पण त्यात कोणी येत नाही, मग तुम्ही घ्या ना पुढाकार जिथे गरज वाटतेय तिथे तुम्ही स्वतः जा.  बाबा आमटे बघा कसे राहिले आणि तुम्ही बघा कसे रहाताय? असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण नामात खुप शक्ती आहे, नामाला कसलेही बंधन नाही करा नामस्मरण मस्त मजेत बघू कश्या अडचणी येतात.... बाकी महाराजांवर सोडा महाराज जसे ठेवतील तसे राहण्याची तयारी ठेवा, तारा किंवा मारा पण महाराज आम्हाला सोडू नका असे म्हणून स्वतःला समर्पण करा मग बघा महाराज कशी काळजी घेतात तुमची.
बाकी मला काही येत नाही जे महाराजांनी लिहून घेतले ते लिहिले.

श्री स्वामी समर्थ
रितेश र. वेदपाठक