Sunday, September 22, 2019

नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे...

नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे...
      श्री राम भक्त हनुमान हे सर्वात मोठे नाम साधनेचे उत्तम उदाहरण आहेत, हनुमानने संपूर्ण आयुष्य फ़क्त राम नाम जपले, त्यातूनच त्याने त्यांच्या गुरुला म्हणजे रामाला मिळवले. आपणही तेच केले पाहिजे, फ़क्त नाम जप करत रहायचे  त्यातून काय मिळेल याचा विचारच मुळी करू नये, म्हणतात ना कर्म किये जा फल की चिंता मत कर अगदी तसेच.
      पण आजच्या जीवनात प्रत्येकाला झटपट गुरु हवा असतो, मग त्यासाठी कोणीही गुरु म्हणून समोर आला तरी साधकाचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास बसतो. कोणीही उपटसुम्भ येतो आणि आपल्याला म्हणतो,"चल माझ्या बरोबर मी तुला दीक्षा देतो." आणि आम्ही भावनेच्या आहारी जाउन त्याच्या मागे लागतो. का तुम्हाला स्वतःची बुद्धि नाही??? कशी असणार आजच्या धकाधकीच्या जीवनात पेपर वाचायला चावट कथा वाचायला वेळ आहे, पण दुर्मिळ ग्रंथ वाचायला वेळ नाही. अरे दीक्षा काय भातुकलीचा खेळ वाटला का? कोणालाही मिलायला.आम्ही गुरुचरित्र वाचतो, पण अनुकरण काय???? पोथी नुसती वाचून काय उपयोग??? त्या वर काही अनुकरण?? शून्य. उपड़या घड्यावर पाणी.
       जरी खरा गुरु मिळाला तरी तो सांगेल त्या मार्गावर जायची तैयारी आहे का??? नाही??? अजिबात जमणार नाही. मग उगाच हट्ट का करता मला अध्यात्मात पुढे जायचय म्हणून गुरु जे सांगेल ते ऐकले पाहिजे, जा गीता वाचा आणि त्याचे अनुकरण करा आयुष्य सोपे होईल जगायला. पण नाही??? शिवाजी जन्मावा पण बाजूच्या घरात. तसेच अध्यात्मचेही आहे, आम्हाला गुरु हवाय पण साधने शिवाय??? आयुष्यभर ऋषिमुनींनी साधना केली आणि सिद्धि मिळावल्या, आपल्याला जमणार आहे का?? पारायण चालू आहे 7 दिवसांचे पण बाजूने पोरगी गेली तरी, काय कड़क माल आहे यार??? ऎसे बोलनारे पुष्कळ पहिलेत.. काही मंडळी तर देवळात चक्क देवाला दर्शन द्यायला येतात. तिची साडी बघ? मंगळसूत्र बघ? अमके बघ? तमके बघ? हे विचार चक्क दर्शन घेताना असतात... म्हणजे देवळात देवाचेच लक्ष्य तुमच्याकडे आणि तुमचे इकडे तिकडे. कशाला हवे आहे ते??? गप गुमान नामस्मरण करा ना?? डोक्याला शांती मिळेल. आलात कशाला? करताय काय?
      संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी खर्ची करा आनंद मिळतो. काहीही करत असाल तरीही नामस्मरण करा इतर विचार मनात आणु नका. त्यातूनच अध्यात्माची प्रगति होते जे जेव्हा घडायचे आहे तेव्हाच ते घडणार, तुम्ही, आम्ही कितीही डोके आपटले तरीही उपयोग काहीही होणार नाही. म्हणूनच नामाला आपल्या अंगी इतके भिनवा, की आपल्याला इतरत्र लक्ष जाण्याचा त्रास होणार नाही, नामासाठी वेडे व्हा तेव्हाच योग्य गुरु तुमच्या समोर उभा राहील. तो कधी मिळेल याच्या मागे तुम्ही नका लागुत!!! योग्य वेळ आली की घडेलच. कड़क परीक्षा द्यायची तैयारी ठेवा... नामस्मरण मुखी ठेवा स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल......
        अशक्य ही शक्य करतील स्वामी हे कायम लक्षात ठेवा. तुमचा खरा गुरु स्वामीच आहे, बाकीचे फ़क्त स्वामी भक्त आहेत हे लक्षात असू देत. त्यांच्या साधनेला नमस्कार आणि त्यांना टाटा बायबाय.........
श्री गुरुदेव दत्त.......
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

आपला
स्वामिभक्त(खुळा)
7972033197
8421132224

Friday, September 20, 2019

खाली मेरी झोली

जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी

दहा हजार पायऱ्या चढतांना बऱ्याच जणांना सर्वात पहिले डोळ्यासमोर अंधारच येतो, इतक्या पायऱ्या आपण कसे चढणार? यातच अर्धे खचून जातात, त्यापेक्षा नामस्मरण करत चढतांना खूप मजा येते.
दत्त पादुकांचे दर्शन मन मोहून जाते, दत्त धुनीचा मंद सुवास शरीरातला सर्व थकवा घालवून टाकतो, आजूबाजूचा डोंगररांगांचा परिसर तिथेच बैठक मारायला भाग पाडतो. परंतु अशा अवस्थेत तिथे बसणेही मुश्किल, लोक आपल्याच पाया पडायला रांगा लावतात, आणि मग तेथून पळ काढावा लागतो.......

दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेलं असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मलातरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा गिरनार ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला, आणि आजही पुरवत आहेत, बरीच मंडळी मागे लागतात की आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत घ्या, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही? अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्व कष्टाच्या साधनेने, उगाच ओढून- ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्वाची, नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही, भले- भले संत- महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते, मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जाते. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही, दहा वेळा बजावून देखील ऐकले नाही की सळो को पळो करणार आणि अक्कल आली की सरळ रेषेत आणणार. तो पर्यंत वेळ जातो आणि कष्ट खूप करावे लागतात, पण पर्याय नसतो. म्हणूनच वेळेवर योग्य वागणे गरजेचे आहे.सरळ साधे नाम घ्यावे, त्याच रंगी रंगावे आणि समाधान मानावे, परमार्थ त्यातच मिळतो, उगाच मला हवेच म्हणून काहीच मिळणार नाही उलट हातातले गमवायची येते. त्यापेक्षा मिळेल ते घेऊन जपले तर कृपा वर्षाव अनंत कृपेने रहातो.

पिछे ना आ मेरे यारा, हमारे हाथ कूछ भी नही,
हमतो वो फकीर है जीसकी झोली भी खाली है,
हमतो कुछ भी नही स्वामी ही खिलाडी है ll
बाबाके खेल बाबाही जाने हमतो उसके बिघडे शहेजादे.....

आपला,
स्वामी नामी बिघडलेला
स्वामीभक्त(खुळा)
रितेश रविंद्र वेदपाठक.
🚬जय शंकर

अशाच एका गिरनारच्या वळणावर

अशाच एका गिरनारच्या वळणावर ते भेटले, पायाची नखे वाढलेली, तुरुतुरु धावणारे, पण घट्ट धरूनच ठेवावं त्या पायांना असा अविर्भाव झाला, कमरेखाली भगवी लुंगी, अंगात सफेद बंडी, उंच धिप्पाड देह, काखेत झोळी, गळ्यात छोट्या रुद्राक्षांची माळा,पांढरी शुभ्र खुरतडलेली दाढी, डोळ्यावर चष्मा, अंगकांती सुद्धा तेजोमय अशी, डोक्यावर पांढरे केस, मुखात राम नाम, त्यांना बघताच क्षणी असे वाटले की माझे जणू स्वामी आजोबाच समोर उभे ठाकले. त्यांनी देखील समोर बघताच ब्रम्हांड हास्य केले, जणू काही ते माझी वाटच पहात होते, त्यांनी पायातील वहाण बाजूला केले आणि मला साष्टांग दंडवताचे आमंत्रण दिले. बऱ्याच वर्षा पासून याच क्षणाची वाट पहात होतो, आधी हट्ट करून देखील लांबूनच बोल म्हणणारे आज चक्क समोर पाय मोकळे करून धर म्हणाले, यात माझा आनंद गगनात मावेनासा झाला, मुखी त्यांच्या रामनाम होते पण मला जणू माझा रामराया मिळाला.

मी काय? कार्य काय? तुम्ही माझे कोण? नकळत प्रश्न त्यांच्यासमोर निघाले तर म्हणाले, "साधन.माशाच्या पिलालापोहायचे कसे हे शिकवायचे नसते .सांगायला बापाची परवानगी नाही ." म्हणजे मी अजून तयार झालो नाही याची 100% खात्री पटली, बापाची आखणी सुरू आहे त्यांचे लक्ष आहे यात समाधान होते. नकळत शब्द फुटले...

ना मे जानू हिरे मोती
ना मे जानू साज रे
गुरू सेवा सदा करू
यही मन मे ध्यास रे......

तर मला म्हणतात कसे,

"सद्गुरु तेरा हिरा
सद्गुरू तेरा मोती
सद्गुरु तेरा साज
सद्गुरू तेरा आवाज
सद्गुरूही तेरा अंदाज ."

काय बोलावे सुचलच नाही, ते ही हसले, मी म्हणालो अजून काय तर म्हणाले, खुळ्या वेळ संपली, योग्य वेळी योग्य ठिकाणी पुन्हा भेट होईलच.
तुझ्यावर कार्य सोपवले आहे ते घडावे म्हणून आपली भेट.....

स्वतः तिथेच बसून मला मात्र चालता केला पुन्हा भेटण्यासाठी, अजून एक पर्व सुरू, जय गिरनारी.......

स्वामीभक्त (खुळा)
श्री रितेश रविंद्र वेदपाठक.