Saturday, February 1, 2020

गजर तुझ्या नामाचा सदा मुखी माझ्या.

नमीतो तव चरणी नामाचा खुळा,
घे रे ध्यास या खुळ्याचा देवा.
भजतो नाम तुझे देहबुद्धी हरपून,
होऊ दे रे मला प्रपंचाचे वीस्मरण.
नामाचा प्रपंच आणि प्रपंचाचे नाम,
खुळ्याचा भोळा भाव देवा तुलाच ठाव.
तव चरणी ठेवी माथा हा खुळा स्वामीभक्त,
नामाच्याच पाठीमागे धावतो माझा भगवंत.
चुकांची क्षमा असावी स्वामीराया,
चरणी वाहतो आमुची दिन काया.
द्यावे अभय तुमच्या चरणांपाशी,
दिनदैना झाली माझी आस तुझ्या भेटीची.
भेट घेतो गिरीनारी देवा तुझ्या पर्वती,
घे मला मिठीत गर्जूदे तुझ्याच नामाचा गजर.

स्वामी हो,
तुमच्याच नामी रंगलेला
तुमचा खुळा.
(रथसप्तमी ०१/०२/२०२०)

13 comments:

  1. श्री स्वामी समर्थ जय गिरनारी

    ReplyDelete
  2. श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  3. श्री स्वामी समर्थ.

    ReplyDelete
  4. श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  5. अप्रतिम, सुंदर, श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  6. श्री स्वामीं समर्थ

    ReplyDelete
  7. श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  8. श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  9. Shree swami samarth
    Jai jai swami samarth 💐

    ReplyDelete
  10. श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete