Tuesday, March 24, 2020

मानसपूजा

श्री स्वामी समर्थ,
||जाते जाते बोले स्वामी,
हम गया नही जिंदा है.||

स्वामींनी जर स्वतःच सांगितले आहे की मी इथेच आहे मग आपण का  शोध घेत फिरतोय त्यांचा? ते आपल्यातच आहेत. "मुझे वही जानता है जो खुद को समझता है." शंकर बाबा नेहमी हेच म्हणतात ना? मग ओळखायला शिका स्वतःला. "मुझे तेरे हृदय में देखने की कोशीश कर मे सदा तेरे साथ हूं" हे वाक्य तर गिरनार वारी करून आल्यावर जो तिथून प्रसाद मिळतो त्या धुनीच्या फोटोवर लिहीलेलंच आहे. हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन इतकेच की आपण सध्या कोरोनाच्या प्रभावामुळे स्वतःच्याच घरामध्ये बंदिस्त आहोत लोकांचा वेळ जात नाही आहे म्हणे. पण मग हा वेळ जातोय कुठे? काहीतरी करण्यात वेळ दवडण्यापेक्षा नामस्मरण करण्यात सत्कारणी लावा की ही वेळ, नाहीतरी अशी संधी पुन्हा मिळणे नाही. घराबाहेर येऊन संसर्ग लागण करून घेण्यापेक्षा नामामध्ये दंग होऊन नामाची लागण केव्हाही चांगलीच नाही का?

२६ मार्चला स्वामी समर्थांचा प्रकटदिन आहे, तेव्हा कोणत्याही मठामध्ये जाता येणार नाही ही खंत जर असेल तर साधी सरळ उपासना आहे ती करा , त्यात जो आनंद मिळेल, अनुभव मिळेल तो नंतर मला नक्की कळवा, मानसपूजा हा सर्वोत्तम उपाय आहे, मानसपूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्यनियमाने त्यांची मानसपूजा(मानसिक पूजा) केल्याने सद्गुरु संवादही करु लागतील, व हळूहळू साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल.

"अहं ब्रम्हास्मि" असे अध्यात्मशास्त्र सांगते. याचा अर्थ, "मी" ब्रम्हस्वरुप आहे.

येथे “मी” याचा अर्थ मानवी शरीर असा नाही. 'मी' म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा 'आत्मा' होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरुपे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण-निराकार असल्याने, भगवंताचे प्रातिनिधिक स्वरुप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकाला सद्गुरुंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्मरुपाने साधकाजवळच असतात. साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते. हे वायुसुत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभु राम चंद्राची मूर्ति सीतामाईला दाखविली, या वरुन स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्मरुपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरुंना सचेतन देहस्वरुपात कल्पनेने निर्माण करुन मानसपूजेस प्रारंभ करावा.
 "साधक स्वामींचा" (रितेश वेदपाठक लिखीत)या पुस्तकामध्ये मानस पूजेमधून मिळालेली पोचपावती मी आधीच सर्वांना दिलेली आहे. साधक कोण? हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे, त्यापेक्षा आपण या पुस्तकामधून साधना कशी शिकूया याचा विचार करावा, मानसपूजेमध्ये  साधकाने कायकाय व कसे प्राप्त केले याचे वर्णन साधक स्वामींचा पुस्तकात आहेच. आपण देखील मानसपूजेद्वारे आपली साधना वाढवूया, प्रत्येकाचे नामस्मरण वाढावे व येणाऱ्या काळातील (घोरकलीयुगातील) संकटांना मात देण्यासाठी प्रत्येकाची मानसिकता वाढावी यासाठी मी नेहमीच प्रत्यनशील आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वामींच्या प्रकटदिनी मानसपूजेद्वारे स्वामींना साकडे घालून आपल्या वरील आलेल्या विपत्तीतून लवकर बाहेर काढण्यासाठी महाराजांना प्रार्थना करूया.

सर्वांनी आपल्या घरातच राहून मानसपूजेद्वारे महाराजांचा प्रकटदिनाचा सोहळा साजरा करूया.

आपला,
स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश वेदपाठक.
७९७२०३३१९७
८४२११३२२२४

5 comments:

  1. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  3. श्री रितेश जि , आपण सुचवलेली मानस पूजा , प्रत्यक्ष परब्रह्माने सुद्धा एका मातीच्या शिवलिंगाची पूजा करणार्यास सुचवली होती हे आपणास माहित असेल .मानस पूजा हिच सर्व श्रेष्ठ पूजा आहे हे निश्चित .प्रत्यकाने शरीर आणि मन साफ राखण्याची सवय लावावी म्हणजे संसर्ग होणार नाही, परंतु कर्म गती महान आहे .बापाचे पाय घट्ट धरून ठेवणे हे क्रमप्राप्त आहे तोच तारुन नेणार .


    ReplyDelete
  4. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

    ReplyDelete
  5. Dada mala tumche margadarshan have.... Aaj me tumche Datta anubuti he book wachale.... Tumche dusre book hi magawale ahe.... Tari tumche darshan ghayychi iccha ahe🙏

    ReplyDelete