Friday, July 15, 2016

श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ

ओम गं गणपतये नमः
श्री स्वामी समर्थाय नमः

मनी आहे माझ्या सर्वांसाठी एकाच भाव,
श्री स्वामी समर्थ तू माझी गुरु माउली हेच मला ठाव.
दत्त दत्त दत्त म्हणे मी मजला पाव,
परी मनावरी निर्गुण असा तुझा रे ठाव.
काय आहे माझ्या मनाची दैना, हे अचूक ठाऊक आहे रे तुज,
गत जन्मीच्या पापचच आहे रे, साफ करत अजून हे ओझं.
मन ओतंबून वहात आहे गजर तुझ्या नामाचा,
तुझया नामाविना समर्था मी काय कामाचा.
जो तो येतो आमुच्या पाया पडतो, आपले गुण गणतो,
स्वामी तुझे हे खेळ सारे मी जाणतो, परी येणारा फसतो.
परीक्षा स्वामी किती बघणार, तूच घेणार तूच निभावणार,
हजारदा सांगशील तू रे समर्था, मी असता पाठीशी कोणाची रे तुला चिंता.
चिंता आहे चिते समान, माझा नाद आहे चिंते समान,
नको दूर लोटू आता तू भगवंता, कपाळी ओढ त्याच चितेची कमान.
आभाळी पक्षी हिंडतो, त्यासही तूच बाळ देतो,
ज्यांना बाळ नाही, त्यांचा सांभाळही तूच करतो.
किती रे त्रास घेशील , माझा तू तुझ्यावर,
तुझं बाळ रडतो आहे, तुझा त्रास पाहून.
पादुका पूजता पूजता, तुझाच मी समर्था,
नाम जपता जपता , गावी तुझी नित्य गाथा.
असे तू ब्रम्हा असे तू विष्णू तसेच तूच तो सांब भोळा,
भेट झाली गिरनारी, तू म्हटले मज खुळा रे खुळा.....

श्री स्वामी समर्थ
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ

इच्छा स्वामींची आम्ही फक्त नाममात्र

आपला स्वामीभक्त (खुळा)
रितेश रविंद्र वेदपाठक.🙏

No comments:

Post a Comment