Wednesday, August 3, 2016

गिरनार - एक वादळी अनुभव

श्री स्वामी समर्थ, जय गिरनारी तेरा भरोसा है भारी .....

१ ऑगस्ट २०१६ चा सूर्योदय तू गुरुशिखरावर असावे, आज्ञा झाली मीही तयारीला लागलो...चलो गिरनार, कामत भाऊंना विचारले येता का ? ते हो म्हणाले...माझा सखाच तो बरा पाठ सोडेल त्यातून महाराजांनी दिलेली तंबी. मग काय आनंदी आनंद...
 दिनांक २६ जुलै २०१६ मंगळवार, वेळ सकाळी ६:३०....नेहमीचाच अलार्म वाजला, उठून अलार्म बंद केला आणि पुन्हा आडवा होणार इतक्यात काहीतरी जाणवायला लागले, उलटी होणार बहुतेक? हो, तसेच लागलीच बाथरूम मध्ये पळालो आणि पोट रिकामं होई पर्यंत उलटी केली. मागून 1, 2, 3, 4 अरे हि तर लाईनच्या लागली उलट्यांची. महाराजाना प्रार्थना केली उलटया थांबल्या पण अंगात प्रचंड कमजोरी जाणवु लागली त्यातच सोबतीला ताप आणि थंडी भरली..... डोक्यात एकाच विचार आज मंगळवार, शनिवारी निघायचे कसे??
बुधवार उजाडला ताप, थंडी मागे हाटतच नव्हती त्यात अंगात त्राणही नव्हते.कसाबसा उभा राहत होतो, नामस्मरण अखंड सुरु होते, परंतु शरीराची साथ नव्हती. त्यातच डॉक्टरकडे पळालो,औषध घेऊन आलो, डॉक्टरांनी दिवसात दोन असे तीन दिवसांचे डोसेस दिले मी दोन दिवसात तीन डोस घेतले, थोडे बरे वाटले. निदान घरून निघताना कसलाही त्रास नको, बायकोला ठणठणीत दिसलो तरच ती घरातून बाहेर पडायला देणार, नाही तर घरातर बसावे लागणार. छे महाराजानी कसौटी रितेश कि सुरु केली होती, परीक्षा है बेटा पार हो जाना? महाराजही माझी मजा बघत होते.
शुक्रवार उजाडला तब्येत तशी ठीक पण थकवा भयंकर कस निघायचे, हा प्रश्न पुढ्यात होताच? परत डॉक्टरकडे पळालो औषधें घेऊन आलो, एकीकडे बायको दुसरीकडे आई तब्येतीकडे बारीक लक्ष्य ठेऊन होत्या, पण ठरवलेलं थांबणे नाही..........
दुसरीकडे कामतांची पण तीच हालत सर्दी, खोकला, ताप, कामासाठी त्यांना फोन केला तेव्हा त्यांची हि बायको विचारते अरे रितेश काय हे??? आनंदची तब्येत नाही बरोबर आणि कसे काय जाताय तुम्ही गिरनारला? म्हटलं वहिनी यात आम्ही काय करणार? बापाची मर्जी आमच्या बापाला समजवा वहिनींनी फोन सोडला आणि निघून गेल्या....
मग काय उजाडला शनिवार........वेळ संध्याकाळी ५:३० घरातून मी आणि कामत निघालो मुंबई सेन्टरलला जायला. 2 tire चे तिकीट कन्फर्म होते ट्रेन आली आम्ही बसलो आणि प्रवासाला सुरवात झाली मला ac असून सुद्धा प्रचंड घाम सुटत होता काही समजत नव्हते. त्यात त्या coach चा attendent  भेटला गिरनार ला निघालात का? आम्ही हो म्हणालो, त्याने घाबरवायला सुरवात केली, अरे मी खुप वेळा गेलोय मला माहितेय या वेळी खूप पाऊस असतो, जनावर असतात, त्रास होतो आम्ही लक्षच नाही दिले दोघेही शांत होतो.
दुसऱ्या दिवशी ३१ जुलै २०१६ दुपारी १:४५ गाडी जुनागड स्टेशनला पोचली, तब्येत ठणठणीत जसे कि काही झालेच नाही. अशक्तपणा काय ते माहीतच नाही, वा रे बापा जय गिरनारी तेरा भरोसा है भारी.................
रात्री १२:३० ला निघून चहा घेतला आणि रात्री १:०० वाजता पहिल्या पायरीवर डोके टेकवले, जय गिरनारी म्हणून सुरवात केली समोर प्रचंड धुकं १ फूट पुढे काही दिसत नव्हतं, मनात नामस्मरण करत कामत आणि मी पायऱ्या चढत होतो, एरवी असणारे लाईट सुद्धा आज नव्हते, किर्र काळोख, प्रचंड धुकं, सोसाट्याचा वारा आणि महाराजांची साथ बास जय गिरनारी. सकाळी ५ वाजता गुरुशिखरावर पोहोचलो दर्शन झाले, सिद्धीमंगल स्तोत्र, नरसिंह सरस्वती अष्टक, पद आणि करुणा त्रिपदी सर्व म्हणून प्रसाद घेऊन आम्ही परतीसाठी निघालो, धुनी जवळ येऊन नमस्कार करून महाप्रसाद घेतला, गोरक्ष धुनीला थोडा वेळ थांबून अंबाजीला आलो दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. ९ वाजता सुरुवात करून ११ वाजता पहिल्या पायरी पर्यंत उतरलो खूप छान अनुभव अप्रतिम वातावरण, आणि महाराजांची साथ या सर्वात तब्येत बरी नाही हे काही जाणवलेच नाही आणि जणू काही झालेलेच नव्हते असेच वाटले.....
अशक्य हि शक्य करतील स्वामी.....
श्री स्वामी समर्थ,
जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी

महाराजांनी आज्ञा दिली तेव्हढेच आणि तसेच लिहिले, बाकी जय गिरनारी🙏🙏🙏


आपला,
स्वामीभक्त(खुळा) वसई(प.)
रितेश रविंद्र वेदपाठक
8421132224

No comments:

Post a Comment