Friday, September 2, 2016

श्री स्वामी समर्थ
     श्री म्हणजेच सृष्टीचा करता - करविता असा तो स्वामी, जो मला अणु-रेणु तसेच सृष्टीच्या कणा-कणात सांभाळायला समर्थ असा तो *श्री स्वामी समर्थ*
आजच्या या घोर कलियुगाच्या काळात समाजाची मानसिकता हा खुप मोठा प्रश्न आहे, एखाद्याची नकारात्मक मानसिकता सकारात्मक कशी करणार? हे प्रत्येकाच्या पुढ्यात असलेलं मोठं संकट आहे, बदलता काळ जरी चांगला सुदृढ असला तरी त्या काळा बरोबर बिघडलेली पिढी हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे.
पूर्वी चा काळ आता सारखा प्रगत नसला तरी लहान-मोठ्यांचा आदर करणारा होता आणि आता??? दहा वर्षाचं पोर सुद्धा पस्तिशीच्या व्यक्तीला सणसणीत शिवी देत, हा काळ नाही संस्कृती बदल म्हणावा लागेल. आपल्या आजी-आजोबांची लहानपण आठवा कधी? किती छान होती कारण, त्यांच्यावर घडलेले चांगले संस्कार. आताच्या फास्ट-मुव्हीन्ग लाईफ मध्ये मुलांना संस्कार घडवायला पालकांना वेळ आहे कुठे? मग म्हणायचे आम्ही मेंटली डिप्रेस झालो.
     नकारात्मक विचारांचे मूळ हे इथूनच सुरु होते, सोडा ते बुरसट विचार स्वतः साठी वेळ काढा, एखादा मंत्र घ्या (स्वतःच ठरावा) आणि सतत म्हणायला सुरवात करा, जिथे मोकळा वेळ मिळतो तिथे काहीही करू नका डोळे बंद करा महाराजांना प्रार्थना करा, मी हा तुमच्या सेवेत आलोय मला काही येत नाही, मी अक्कलशुन्य आहे घ्या घडवून काय घ्यायचे ते असे म्हणून डोळे बंद करा आणि करा नामाला सुरवात. नामाचा नाद हा इतर नादापेक्षा खूप भयंकर , पण सकारात्मक शरीरासाठी अति उत्तम.
     सुरवातीला तोंडाने नामस्मरण सुरु होते (आत्ताच लोणचे घातले आहे), हळुहळु डोक्यात घुमते (लोणचे मुरायला लागले) , मग ते डोक्यात भिनते (लोणच्याचा खार फोडीत मुरला समजा) आणि त्या नंतर ते हृदयात धडकते (आता लोणचे खाण्यासाठी तयार) इथूनच सुरु होतो तो नामाचा खेळ इतर गोष्टींचा विचार करायला वेळच नाही फक्त नाम आणि आपण सुरूच राहते.
उठता- बसता,ध्यानी-मनी फक्त नाम रहाते आणि आपोआप विचार बदलतात, त्यातूनच आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वाना विचार बदलायला शिकवतो वास्तविक आपण नाममात्र असतो पण त्या नामाचा प्रभाव आपल्याकडुन ते घडवतो, अशानेच आपली पुढील पिढीसुद्धा घडेल ती सुद्धा आपल्या नामस्मरणानेच.
     बऱ्याच जणांना प्रश्न असतो मंत्र आपल्याला आपल्या गुरूंकडुन मिळावा, अरे पण योग्य गुरु मिळाला तर बरा नाही तर आयुष्य रस्त्याला लावेल की! आपण कशाला करा गुरु? गुरूंची इच्छा असेल तर योग्य वेळी योग्य गुरु राहील समोर उभा, तो पर्यंत आपण नामस्मरण करत राहायचे, सदेह गुरुचे मार्गदर्शन होई पर्यंत वाट पाहायची (तोपर्यंत खरा गुरु ओळ्खण्याइतकी अध्यात्मिक पातळी वाढलेली असते.) एखादे काम केल्याशिवाय मोबदला सुद्धा कोणी देत नाही , महिना दहा हजार कमावणाऱ्यालासुद्धा पूर्ण महिना भरावा लागतो, सुट्टी केली तर पगार कट केला जातो, मग आपण देवाकडून कशी अपेक्षा करतो. त्याला काही नको फक्त मनापासून त्याचे नाम घ्यावे हीच त्याची इच्छा बदल्यात आपल्याला तो खुप काही देतो.
     नामात खुप शक्ती आहे आपल्या मनाचे खेळ ओळखायला शिका, उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिका, विद्या विकत नाही मिळत खरा गुरु हा नेहमी फक्त गुरु दक्षिणा घेतो ती सुद्धा योग्य वेळ आल्यावर, आजच्या युगात कमावणारे खुप आहेत पण गमवायची ताकद मोजक्यांचीच आहेत, कमरेला लंगोटी-खांद्यावर उपरणे वापरायला आवडते बाकी कपडे नकोसे वाटतात पण लोक बाबा बनवतात म्हणुन शर्ट-पॅन्ट वापरणारे बरेच आहेत पण ते खरे मार्गदर्शक आहेत त्यांना शोधा त्यांच्या कडे मीपणा नसतो नम्रपणा असते. ज्ञान वाढवा, नाम वाढवा, ध्यान वाढवा योग्य वेळेची वाट पहा. स्वामींवर विश्वास ठेवा उद्धार नक्की होणार याची खात्री.
श्री स्वामी समर्थ

स्वामींनी सुचवले आम्ही तुमच्यापुढे मांडले, करता-करविता स्वामी आम्ही फक्त नाममात्र.

आपला,
स्वामीभक्त(खुळा)
रितेश र. वेदपाठक
8421132224

Wednesday, August 3, 2016

गिरनार - एक वादळी अनुभव

श्री स्वामी समर्थ, जय गिरनारी तेरा भरोसा है भारी .....

१ ऑगस्ट २०१६ चा सूर्योदय तू गुरुशिखरावर असावे, आज्ञा झाली मीही तयारीला लागलो...चलो गिरनार, कामत भाऊंना विचारले येता का ? ते हो म्हणाले...माझा सखाच तो बरा पाठ सोडेल त्यातून महाराजांनी दिलेली तंबी. मग काय आनंदी आनंद...
 दिनांक २६ जुलै २०१६ मंगळवार, वेळ सकाळी ६:३०....नेहमीचाच अलार्म वाजला, उठून अलार्म बंद केला आणि पुन्हा आडवा होणार इतक्यात काहीतरी जाणवायला लागले, उलटी होणार बहुतेक? हो, तसेच लागलीच बाथरूम मध्ये पळालो आणि पोट रिकामं होई पर्यंत उलटी केली. मागून 1, 2, 3, 4 अरे हि तर लाईनच्या लागली उलट्यांची. महाराजाना प्रार्थना केली उलटया थांबल्या पण अंगात प्रचंड कमजोरी जाणवु लागली त्यातच सोबतीला ताप आणि थंडी भरली..... डोक्यात एकाच विचार आज मंगळवार, शनिवारी निघायचे कसे??
बुधवार उजाडला ताप, थंडी मागे हाटतच नव्हती त्यात अंगात त्राणही नव्हते.कसाबसा उभा राहत होतो, नामस्मरण अखंड सुरु होते, परंतु शरीराची साथ नव्हती. त्यातच डॉक्टरकडे पळालो,औषध घेऊन आलो, डॉक्टरांनी दिवसात दोन असे तीन दिवसांचे डोसेस दिले मी दोन दिवसात तीन डोस घेतले, थोडे बरे वाटले. निदान घरून निघताना कसलाही त्रास नको, बायकोला ठणठणीत दिसलो तरच ती घरातून बाहेर पडायला देणार, नाही तर घरातर बसावे लागणार. छे महाराजानी कसौटी रितेश कि सुरु केली होती, परीक्षा है बेटा पार हो जाना? महाराजही माझी मजा बघत होते.
शुक्रवार उजाडला तब्येत तशी ठीक पण थकवा भयंकर कस निघायचे, हा प्रश्न पुढ्यात होताच? परत डॉक्टरकडे पळालो औषधें घेऊन आलो, एकीकडे बायको दुसरीकडे आई तब्येतीकडे बारीक लक्ष्य ठेऊन होत्या, पण ठरवलेलं थांबणे नाही..........
दुसरीकडे कामतांची पण तीच हालत सर्दी, खोकला, ताप, कामासाठी त्यांना फोन केला तेव्हा त्यांची हि बायको विचारते अरे रितेश काय हे??? आनंदची तब्येत नाही बरोबर आणि कसे काय जाताय तुम्ही गिरनारला? म्हटलं वहिनी यात आम्ही काय करणार? बापाची मर्जी आमच्या बापाला समजवा वहिनींनी फोन सोडला आणि निघून गेल्या....
मग काय उजाडला शनिवार........वेळ संध्याकाळी ५:३० घरातून मी आणि कामत निघालो मुंबई सेन्टरलला जायला. 2 tire चे तिकीट कन्फर्म होते ट्रेन आली आम्ही बसलो आणि प्रवासाला सुरवात झाली मला ac असून सुद्धा प्रचंड घाम सुटत होता काही समजत नव्हते. त्यात त्या coach चा attendent  भेटला गिरनार ला निघालात का? आम्ही हो म्हणालो, त्याने घाबरवायला सुरवात केली, अरे मी खुप वेळा गेलोय मला माहितेय या वेळी खूप पाऊस असतो, जनावर असतात, त्रास होतो आम्ही लक्षच नाही दिले दोघेही शांत होतो.
दुसऱ्या दिवशी ३१ जुलै २०१६ दुपारी १:४५ गाडी जुनागड स्टेशनला पोचली, तब्येत ठणठणीत जसे कि काही झालेच नाही. अशक्तपणा काय ते माहीतच नाही, वा रे बापा जय गिरनारी तेरा भरोसा है भारी.................
रात्री १२:३० ला निघून चहा घेतला आणि रात्री १:०० वाजता पहिल्या पायरीवर डोके टेकवले, जय गिरनारी म्हणून सुरवात केली समोर प्रचंड धुकं १ फूट पुढे काही दिसत नव्हतं, मनात नामस्मरण करत कामत आणि मी पायऱ्या चढत होतो, एरवी असणारे लाईट सुद्धा आज नव्हते, किर्र काळोख, प्रचंड धुकं, सोसाट्याचा वारा आणि महाराजांची साथ बास जय गिरनारी. सकाळी ५ वाजता गुरुशिखरावर पोहोचलो दर्शन झाले, सिद्धीमंगल स्तोत्र, नरसिंह सरस्वती अष्टक, पद आणि करुणा त्रिपदी सर्व म्हणून प्रसाद घेऊन आम्ही परतीसाठी निघालो, धुनी जवळ येऊन नमस्कार करून महाप्रसाद घेतला, गोरक्ष धुनीला थोडा वेळ थांबून अंबाजीला आलो दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. ९ वाजता सुरुवात करून ११ वाजता पहिल्या पायरी पर्यंत उतरलो खूप छान अनुभव अप्रतिम वातावरण, आणि महाराजांची साथ या सर्वात तब्येत बरी नाही हे काही जाणवलेच नाही आणि जणू काही झालेलेच नव्हते असेच वाटले.....
अशक्य हि शक्य करतील स्वामी.....
श्री स्वामी समर्थ,
जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी

महाराजांनी आज्ञा दिली तेव्हढेच आणि तसेच लिहिले, बाकी जय गिरनारी🙏🙏🙏


आपला,
स्वामीभक्त(खुळा) वसई(प.)
रितेश रविंद्र वेदपाठक
8421132224

Friday, July 15, 2016

श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ

ओम गं गणपतये नमः
श्री स्वामी समर्थाय नमः

मनी आहे माझ्या सर्वांसाठी एकाच भाव,
श्री स्वामी समर्थ तू माझी गुरु माउली हेच मला ठाव.
दत्त दत्त दत्त म्हणे मी मजला पाव,
परी मनावरी निर्गुण असा तुझा रे ठाव.
काय आहे माझ्या मनाची दैना, हे अचूक ठाऊक आहे रे तुज,
गत जन्मीच्या पापचच आहे रे, साफ करत अजून हे ओझं.
मन ओतंबून वहात आहे गजर तुझ्या नामाचा,
तुझया नामाविना समर्था मी काय कामाचा.
जो तो येतो आमुच्या पाया पडतो, आपले गुण गणतो,
स्वामी तुझे हे खेळ सारे मी जाणतो, परी येणारा फसतो.
परीक्षा स्वामी किती बघणार, तूच घेणार तूच निभावणार,
हजारदा सांगशील तू रे समर्था, मी असता पाठीशी कोणाची रे तुला चिंता.
चिंता आहे चिते समान, माझा नाद आहे चिंते समान,
नको दूर लोटू आता तू भगवंता, कपाळी ओढ त्याच चितेची कमान.
आभाळी पक्षी हिंडतो, त्यासही तूच बाळ देतो,
ज्यांना बाळ नाही, त्यांचा सांभाळही तूच करतो.
किती रे त्रास घेशील , माझा तू तुझ्यावर,
तुझं बाळ रडतो आहे, तुझा त्रास पाहून.
पादुका पूजता पूजता, तुझाच मी समर्था,
नाम जपता जपता , गावी तुझी नित्य गाथा.
असे तू ब्रम्हा असे तू विष्णू तसेच तूच तो सांब भोळा,
भेट झाली गिरनारी, तू म्हटले मज खुळा रे खुळा.....

श्री स्वामी समर्थ
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ

इच्छा स्वामींची आम्ही फक्त नाममात्र

आपला स्वामीभक्त (खुळा)
रितेश रविंद्र वेदपाठक.🙏

Monday, June 6, 2016

दत्ता दिगंबरा याहो स्वामी मला भेट दया हो।

दत्ता दिगंबरा याहो स्वामी मला भेट दया हो।


जाहले पुन्हा सुरु मनी माझ्या , दत्ता दिगंबरा याहो स्वामी मला भेट दया हो।
मूळ स्वरुप दर्शन दया हो, तुमच्या हाताने प्रेमाचा घास भरवा हो ।।
तृप्त करा माझा शुळ , न लागो तद नंतर कधिही भूक ।
दत्ता अवधूता याहो स्वामी मला भेट दया हो,
पाजा पाणी तुमच्या हस्ते , की कधीही हे शरीर न कोरडे राही न लागे कधी तहान ।।
दत्ता हे दयाळा या हो माउली मला भेट दया हो,
निद्रा आहे येत घ्या डोके तुमच्या मांडित ,
फिरवा हृदयावरि हाथ करा स्थिर माझे अस्थिर मन ।।
दत्ता श्रीपादा या हो गुरुरूपी मला भेट दया हो,
ठेवा डोक्यावर हाथ , करा मजला शिष्य तुमचा ख़ास ।
दया विद्या मजला ख़ास ज्याने होई अधर्माचा नाश ,
करुया स्वामी नाम जप घडवूया स्वामी भक्त ।।
दत्ता स्वामीरूपा या हो माउली मला भेट दया हो।।

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
मनी गहिवरले ते लिहून मोकळे केले...
श्री स्वामी समर्थ

स्वामीभक्त(खुळा)
श्री.रितेश र. वेदपाठक

Tuesday, March 1, 2016

नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे...
      श्री राम भक्त हनुमान हे सर्वात मोठे नाम साधनेचे उत्तम उदाहरण आहेत, हनुमानने संपूर्ण आयुष्य फ़क्त राम नाम जपले, त्यातूनच त्याने त्यांच्या गुरुला म्हणजे रामाला मिळवले. आपणही तेच केले पाहिजे, फ़क्त नाम जप करत रहायचे  त्यातून काय मिळेल याचा विचारच मुळी करू नये, म्हणतात ना कर्म किये जा फल की चिंता मत कर अगदी तसेच.
      पण आजच्या जीवनात प्रत्येकाला झटपट गुरु हवा असतो, मग त्यासाठी कोणीही गुरु म्हणून समोर आला तरी साधकाचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास बसतो. कोणीही उपटसुम्भ येतो आणि आपल्याला म्हणतो,"चल माझ्या बरोबर मी तुला दीक्षा देतो." आणि आम्ही भावनेच्या आहारी जाउन त्याच्या मागे लागतो. का तुम्हाला स्वतःची बुद्धि नाही??? कशी असणार आजच्या धकाधकीच्या जीवनात पेपर वाचायला चावट कथा वाचायला वेळ आहे, पण दुर्मिळ ग्रंथ वाचायला वेळ नाही. अरे दीक्षा काय भातुकलीचा खेळ वाटला का? कोणालाही मिलायला.आम्ही गुरुचरित्र वाचतो, पण अनुकरण काय???? पोथी नुसती वाचून काय उपयोग??? त्या वर काही अनुकरण?? शून्य. उपड़या घड्यावर पाणी.
       जरी खरा गुरु मिळाला तरी तो सांगेल त्या मार्गावर जायची तैयारी आहे का??? नाही??? अजिबात जमणार नाही. मग उगाच हट्ट का करता मला अध्यात्मात पुढे जायचय म्हणून गुरु जे सांगेल ते ऐकले पाहिजे, जा गीता वाचा आणि त्याचे अनुकरण करा आयुष्य सोपे होईल जगायला. पण नाही??? शिवाजी जन्मावा पण बाजूच्या घरात. तसेच अध्यात्मचेही आहे, आम्हाला गुरु हवाय पण साधने शिवाय??? आयुष्यभर ऋषिमुनींनी साधना केली आणि सिद्धि मिळावल्या, आपल्याला जमणार आहे का?? पारायण चालू आहे 7 दिवसांचे पण बाजूने पोरगी गेली तरी, काय कड़क माल आहे यार??? ऎसे बोलनारे पुष्कळ पहिलेत.. काही मंडळी तर देवळात चक्क देवाला दर्शन द्यायला येतात. तिची साडी बघ? मंगळसूत्र बघ? अमके बघ? तमके बघ? हे विचार चक्क दर्शन घेताना असतात... म्हणजे देवळात देवाचेच लक्ष्य तुमच्याकडे आणि तुमचे इकडे तिकडे. कशाला हवे आहे ते??? गप गुमान नामस्मरण करा ना?? डोक्याला शांती मिळेल. आलात कशाला? करताय काय?
      संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी खर्ची करा आनंद मिळतो. काहीही करत असाल तरीही नामस्मरण करा इतर विचार मनात आणु नका. त्यातूनच अध्यात्माची प्रगति होते जे जेव्हा घडायचे आहे तेव्हाच ते घडणार, तुम्ही, आम्ही कितीही डोके आपटले तरीही उपयोग काहीही होणार नाही. म्हणूनच नामाला आपल्या अंगी इतके भिनवा, की आपल्याला इतरत्र लक्ष जाण्याचा त्रास होणार नाही, नामासाठी वेडे व्हा तेव्हाच योग्य गुरु तुमच्या समोर उभा राहील. तो कधी मिळेल याच्या मागे तुम्ही नका लागुत!!! योग्य वेळ आली की घडेलच. कड़क परीक्षा द्यायची तैयारी ठेवा... नामस्मरण मुखी ठेवा स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल......
        अशक्य ही शक्य करतील स्वामी हे कायम लक्षात ठेवा. तुमचा खरा गुरु स्वामीच आहे, बाकीचे फ़क्त स्वामी भक्त आहेत हे लक्षात असू देत. त्यांच्या साधनेला नमस्कार आणि त्यांना टाटा बायबाय.........
श्री गुरुदेव दत्त.......
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
आपला फ़क्त स्वामिभक्त
रितेश र. वेदपाठक

Saturday, February 27, 2016

ॐ द्राम दत्तात्रेयाय नमः
आजच्या कलियुगात अध्यात्म या विषयचा बाजार मांडलेला आहे.
ज्यांना अध्यात्म काय आहे हे ही माहित नाही ऎसे लोक अध्यात्म या विषयांवर भाषणे देतात, त्यांच्या गोड वाणीला आपले मध्यम वर्गीय सेवेकरी फसतात. उगाच कोणाच्या तरी मागे लागायचे आणि समोरच्याने आपला वापर केला हे समजल्यावर त्या वरच्याला दोष द्यायचा सोडा हे धंदे.......
अध्यात्मामधे पुढे जायची खरी इच्छा असेल तर काही ठराविक गोष्टी पाळाव्या लागतात आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास , श्रद्धा, आणी सबुरी....
सर्वात पहिले स्वतःचा अहम् (igo) सोडा, मिपणाला मोड़ा आणी पुढे चला, मग बघा मार्ग कैसे मोकळे होतात ते. सदैव नामस्मरण मुखी ठेवा, आपल्या आयुष्यात चांगले घडले ते आपल्या गुरु आशिर्वादाने , वाईट घडले ते आपल्या पूर्व कर्मीचे भोग आहेत, गड्या भोगं संपव, हीच भावना कायम ठेवा. मी ऎसे केले मई तैसे केले कशाला हवा हा तोरा हाच स्वाभाव तुमच्या मार्गातला सगल्यातला मोठा काटा आहे.
     एक साधक स्वामींची सेवा 2 वर्षांपासून करतो आणी तो दुसरयाला सेवेचि माहिती देतो. दोघे मिळून 5 वर्षे सेवा करतात. पहिल्याची एकूण सेवा 7 वर्षे जाहली दुसरयाची 5 वर्षे परंतु अध्यात्मात दूसरी व्यक्ति पहिल्यापेक्षा पुढे गेली, म्हणून पहिल्याने दूसरयावर का राग धारावा. त्याने जे कमवले ते त्याच्या सेवेनी कमवले हे सत्य माना, आपण कुठेतरी चुकतोय हे सत्य माना, उगाच मी त्याला आणले आणी तो पुढे गेला हे मनात आणून स्वतः 1 पाऊल मागे येऊ नका. तुम्ही कोण त्याला आणणारे तुमचा बाप तुमचे माध्यम बनवुन सर्व खेल खेळतो, त्याचे काम झाले की दूधावरचि साय जैसे अलगच बाजूला करावी तैसे तुम्हाला बाजूला करतो.
      आध्यात्मिक दृष्टीने पुढे जायची खाज प्रत्येकाच्या बुडाला असते पण आगितुन जा म्हटले तर आधीच बुडाला आग लागते. जर जमत नसेल तर सोडा हा विषय कारण हा विषय म्हणजे साक्षात विष आहे. विषाची परीक्षा घेण्यापेक्षा आहे ते जीवन जगा शांत रहा संयमानी वागा, दोक्यातल्या रागाला केराच टोपल दाखवा.
       उगाच मला गुरु करायचे म्हणून बोम्बलू नका, तितके सोपे नाही ते, सतत नामस्मरण सुरु ठेवा योग्य वेळ आल्यावर स्वामी योग्य मार्गदर्शन करतील. तो पर्यन्त विश्वास ठेवा स्वतः वर आणी बापावर, बाप जितका प्रेमळ आहे न त्याच्या उलट खड़ूस पण आहे इतक्या सहज तो जवळ करत नाही, आणी केले टार सोडत नाही.
        पुन्हा सांगिन नामस्मरण सुरु ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा मार्ग नक्कीच सापडेल, उगाच हावरटपणा करू नका उलटी होईल नाहीतर अतिसार होईल.
मी कोणी लेखक नाही पण स्वामींनी जे सुचवले ते तुमच्या पुढे मांडले.
श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
आपला स्वामीभक्त
रितेश र.वेदपाठक